Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाना पटोलेकडून वेगवान घडामोडी, उद्धव ठाकरेचीं नाराजी वाढणार

नाना पटोलेकडून वेगवान घडामोडी, उद्धव ठाकरेचीं नाराजी वाढणार 


मुंबई : लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसला पुन्हा एकदा नवसंजिवनी मिळाली. २०१९ च्या तुलनेत जागांमध्ये वाढ झाली. मात्र काँग्रेसला १०० जागांपर्यंत मजल मारता आली नाही. महाराष्ट्रातही काँग्रेसला चागंल यश मिळालं. मात्र महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून बराच वाद झाला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सांगलीत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली. यात स्थानिक काँग्रेस नेत्यांनी विशाल पाटील यांना छुपी मदत केल्यानं उद्धव ठाकरे यांची काँग्रेसवर नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

निकालानंतर काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला असून सांगलीचे नवनिर्वाचित अपक्ष खासदार विशाल पाटील हे नाना पटोले यांची भेट घेणार आहेत. दोघेही आज मुंबईत भेटणार आहेत. या बैठकीनंतर विशाल पाटील हे सहयोगी खासदार म्हणून काँग्रेसमध्ये येऊ शकतात. सांगलीत बंडखोरी केली तरी काँग्रेसने विशाल पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाहीय. दुसऱ्या बाजूला सांगलीच्या जागेवर विशाल पाटील यांना काँग्रेसने मदत केल्याने उद्धव ठाकरे संतापले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विशाल पाटील यांच्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केलीय. सांगलीत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मविआच्या उमेदवाराऐवजी बंडखोर विशाल पाटील यांना मदत केल्याचे आऱोप होत आहेत. त्यावर संजय राऊत यांनी निवडणूक झाली, निकाल लागला. आता आम्ही सगळं विसरलो असं राऊतांनी म्हटलंय.

दरम्यान, ⁠विशाल पाटील यांचे काँग्रेस कार्यालयात जल्लोषात स्वागत होणार आहे. ⁠विशाल पाटील हे सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषामुळे सांगलीत पडद्यामागे काय घडलं हे आता समोर येत आहे. विशाल पाटील काँग्रेससोबत आल्यानं पक्षाचे बळ वाढणार असले तरी शिवसेना या पराभवाचा जाब आघाडीच्या बैठकीत विचारणार असल्याची माहितीसुद्धा समोर आलीय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.