प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी सकाळी त्याला रेणुका स्वामी हत्याकांडात ताब्यात घेण्यात आलं आहे. दर्शनबरोबर आणखी काही जणांना देखील ताब्यात घेण्यात आलं.
यापैकी एकानं दर्शननं खुन केल्याचं कबूल केलं आहे. दरम्यान या हत्याकांडात सध्या दर्शनला 6 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी त्याचा जवळचा मित्र आणि अभिनेत्री पवित्रा गौडा हिला देखील ताब्यात घेतलं आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका स्वामी हा दर्शन आणि त्याची मैत्रिण पवित्रा गौडा यांना अश्लील मेसेज पाठवायची. याच रागानं त्यांनी रेणुका स्वामीची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह बंगळुरूच्या कामाक्षीपाल्या येथील कालव्यात फेकून दिला.
पोलिसांच्या माहितीनुसार, रेणुकाच्या हत्येवेळी 9 आरोपी दर्शनबरोबर तिथे होते. पोलिसांनी अभिनेत्री पवित्रा गौडा हिला देखील ताब्यात घेतलं आहे. तिचा रेणुका स्वामीच्या हत्येशी काही संबंध आहे का याचा ते शोध घेत आहेत. मागील काही वर्षांपासून पवित्राचं नाव दर्शनबरोबर जोडलं जात आहे. त्यामुळे यात तिचा देखील पाठिंबा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.हे प्रकरण नेमकं काय आहे याचा आढावा घेऊया. रेणुका स्वामीचा मृतदेह 8 जून 2024 रोजी बंगळुरूच्या सुमनहल्ली ब्रिजवर मृतावस्थेत आढळला. ती चित्रदुर्ग येथील अपोलो फार्मेसीमध्ये काम करत होती. मृतदेहावर गंभीर जखमा पोलिसांना आढळून आला. लाडकी दांडक्यानं मारल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपींनी तिचा मृतदेह वृषभवती खाऱ्योत फेकण्याचा प्लान होता. मृतदेह कुत्र्यांनी कुडतडल्याचा देखील खुणा आढळल्या आहेत.
या प्रकरणात अभिनेता दर्शनच्या विरोधात व्हिडीओ सापडला आहे. कर्नाटक पोलिसांनी एक व्हिडीओ समोर आणला आहे ज्यात दर्शनची कार घटनास्थळाच्या बाजूला पाहिली गेली आहे. त्यावेळी कारच्या आतमध्ये कोण होतं हे अद्याप समोर आलेलं नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.