Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस कोठडीत अस्वछतेमुळे त्रास होत आहे :, शिवानी अग्रवालची तक्रार

पोलीस कोठडीत अस्वछतेमुळे त्रास होत आहे :, शिवानी अग्रवालची तक्रार 


पुणे :- रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या शिवानी अग्रवाल हीने पोलिस कोठडीत अस्वच्छतेमुळे त्रास होत आहे, अशी तक्रार बुधवारी न्यायालयात केली. पोलिस कोठडी सुनावल्यानंतर शिवानी हिला फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारातील कोठडीत (लॉकअप) ठेवण्यात आले आहे. कोठडीत अस्वच्छता आहे. अस्वच्छतेमुळे त्रास होत असल्याची तक्रार शिवानीने न्यायालयात केली. तिच्या तक्रारीची न्यायालयाने दखल घेतली. वकिलांमार्फत न्यायालयात तक्रार नोंदवावी, असे आदेश देण्यात आले आहे.

याच गुन्ह्यात ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, मुंबर्इने दोघांना कारणे दाखवा नोटीस पाठवून सात दिवसाच्या आत म्हणणे मांडायला सांगितले आहेत. डॉ. हाळनोर यांच्यावतीने बाजू मांडतांना ॲड ऋषिकेश गानू यांनी न्यायालयात सांगितले की, डॉ. हाळनोर यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची कारणे दाखवा नोटीस मंगळवारी मिळाली आहे.

त्याला उत्तर देण्यासाठी डॉ. हाळनोर यांना कागदपत्रांची गरज असून ही कागदपत्रे ही बीजे मेडिकल येथील खोलीतील आहेत. ही खोली सील करण्यात आली आहे. तसेच मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यातील कागदपत्रे मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, बी. जे. मेडिकल येथील डॉ. हाळनोर यांची खोली पोलिसांनी नाही तर ससून प्रशासनाने सील केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.