Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

होय रक्त मीच दिल होत... अल्पवयीन बाळाच्या आईची कबुली

होय रक्त मीच दिल होत... अल्पवयीन बाळाच्या आईची कबुली 


कल्याणीनगर अपघात प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. अशातच आज एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर जे ब्ल़ सॅम्पल बदलण्यात आले होते ते आईचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आज, ते बदललेलं ब्लड सॅम्पल अल्पवयीन आरोपीच्या आईचे असल्याची माहिती समोर आली आहे. 
पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईने पोलिसांसमोर धक्कादायक कबुली दिली आहे. रक्त मीच दिलं होतं आणि माझा मुलगाच गाडी चालवत होता अशी कबुली शिवानी अग्रवाल यांनी दिली आहे. आरोपीच्या आईने दिलेल्या कबुलीनं खळबळ उडाली आहे.
तर अपघातानंतर रक्त बदलण्याचा निर्णय दोघांनी घेतल्याचं देखील शिवानी अग्रवालने कबुल केलं आहे. तर अपघात झाला त्यावेळी मुलगा कार चालवत होता अशी माहितीही तिने दिली आहे. गेल्या अनेक चौकशीदरम्यान अग्रवाल कुटुंब सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. मात्र, आज आरोपीच्या आईने आज कबुली दिली आहे. 
याच प्रकरणात अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात दोन डॉक्टर आणि एका सफाई कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

बुधवारी राज्य शासनाने ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तपासामध्ये रोज नवनव्या लोकांच्या चौकशा होताना दिसून येत आहेत. अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलल्यामुळे सगळा गदारोळ उडाला होता. याशिवाय, अल्पवयीन आरोपीचं म्हणून जे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आलेलं होतं, ते आरोपीच्या आईचं होतं, अशाही बातम्या समोर आल्या होत्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.