Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कंनाच्या कानाखाली आवाज काढणाऱ्या CISF जवान महिलेची प्रतिक्रिया, म्हणाली......

कंनाच्या कानाखाली आवाज काढणाऱ्या CISF जवान महिलेची प्रतिक्रिया, म्हणाली......


अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतसोबत आज चंदीगड विमानतळावर धक्कादायक प्रकार घडला. विमानतळावर एका CISF च्या महिला रक्षकानंच कंगनाच्या कानशिलात लगावली. याशिवाय तिनं कंगनाला शिवीगाळही केला. ही घटना सध्या वाऱ्यासारखी पसरली आहे. ज्या महिलेनं कंगनावर हात उचलला तिच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ समोर आला आहे.
कंगना चंदीगडवरुन दिल्लीकडे रवाना होत असताना विमानतळावर राडा झाला. कंगनाच्या कानशिलात मारल्यानंतर आणि तिला शिवीगाळ केल्यानंतर CISF महिला जवानानं सांगितलं की, जेव्हा कंगनानं शेतकरी आंदोलन करणाऱ्यांवर टीका केली होती आणि त्यांना म्हटलं होतं की, 100 रुपये घेऊन या शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. तेव्हा माझी आई त्या आंदोलनात होती. माझ्या आईला 100 100 रुपये घेऊन धरणा आंदोलनाला गेलं असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, कंगनानं बठिंडा गावातील बहादुरगडच्या शेतकरी असलेल्या 87 वर्षीय महिंदर कौरवर ट्विट केलं होतं. तिनं त्यांना बाकी महिलांशी तुलना करत 100 रुपये घेऊन शेतकरी आंदोलनाला बसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर महिलेनं कंगनाविरुद्ध कोर्टमध्ये धाव घेतली होती. याविषयी 13 महिने सुनावणी सुरु होती.

महिलेनं कंगनावर आरोप केले होते की, कंगनानं तिची तुलना प्रतिमा बिघडण्याचं काम केलं आणि यामुळे तिला खूप मानसिक त्रास झाला. समाजामध्ये त्यांची प्रतिमा खराब झाली. दोन वर्षापूर्वीचं हे प्रकरण कंगनाला भोवलं असून यामुळे कंगना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.