' तू देवासारख्या व्यक्तीला सोडलेस ', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या चाहत्यांचीं कमेंट वाचून Ex - Wife चा मोठा खुलासा,' त्यानेच मला......'
दाक्षिणात्य अभिनेत्री रेणु देसाईने अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण यांच्याशी 2008 मध्ये लग्न केलं होतं. पण चार वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला होता. 2012 मध्ये त्यांनी काडीमोड घेतल्यानंतर बरीच चर्चा रंगली होती. कारण लग्नाच्या 8 वर्षं आधी दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत होते. दोघांना अकिरा आणि आध्या नावाची दोन मुलं आहेत. पवन कल्याण आणि रेणु देसाई वेगळे झाले असले तरी पवन कल्याण यांचे चाहते आजही त्यांच्या घटस्फोटावर भाष्य करत असतात. नुकतंच एका चाहत्याने रेणु देसाईला पवन कल्याण यांच्यासारख्या महान व्यक्तीला सोडल्याची टीका केली. त्यावर रेणु देसाईने फक्त खडेबोल सुनावले नाहीत, तर धक्कादायक खुलासाही केला.
पवन कल्याण यांच्या एका चाहत्याने रेणु देसाई यांच्या इंस्टाग्रामला एक कमेंट केली होती. यात त्याने तिच्यावर संयम न राखल्याचा आणि पवन कल्याण यांना घटस्फोट दिल्याचा आरोप केला. यानंतर रेणु देसाईनेही त्यावर उत्तर देत आपल्या घटस्फोटाबद्दल काही धक्कादायक खुलासे केले.
चाहत्याने नेमकी काय कमेंट केली?
चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं होतं की, "तू जास्त संयम ठेवायला हवा होता. तू देवासारख्या एका व्यक्तीबद्दल गैरसमज करुन घेतला आहे. कदाचित आता तुम्हाला त्याची किंमत कळली असेल. पण मुले पवन कल्याण यांच्यासोबत आहेत याचा मला आनंद आहे".
रेणु देसाईचा धक्कादायक खुलासा
ही कमेंट वाचताच रेणु देसाईचा पारा चढला आणि तिनेही उत्तर दिलं. यावेळी तिने आपण नाही तर पवन कल्याण यांनी आपल्याला सोडलं असा खुलासा केला. तसंच अशा कमेंट करु नका असंही सुनावलं. तिने उत्तरात म्हटलं की, "जर तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल तर तुम्ही अशी मूर्ख टिप्पणी करणार नाही. त्यानेच मला सोडून दुसरं लग्न केलं, कृपया अशा टिप्पण्या टाळा, त्या फक्त मला त्रास देतात".
पवन कल्याण यांनी केलं तिसरं लग्न, रेणु देसाईने दुसरं लग्न टाळलं
जनसेना पक्षाचे नेते, पवन कल्याण यांनी रेणू देसाईपासून विभक्त झाल्यानंतर अॅना लेझनेवाशी तिसरं लग्न केलं. परंतु रेणुने पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला. रेणूचा काही वर्षांपूर्वी साखरपुडा झाला होता, पण तिेनेच नंतर लग्न मोडलं होतं. 2023 मध्ये एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत, रेणूने खुलासा केला होता की, तिची मुलगी आध्या जी त्यावेळी सात वर्षांची होती, त्यामुळे तिने पुन्हा लग्नाच्या निर्णयावर पुनर्विचार केला.
जनसेना पक्षाचे नेते, पवन कल्याण यांनी रेणू देसाईपासून विभक्त झाल्यानंतर अॅना लेझनेवाशी तिसरं लग्न केलं. परंतु रेणुने पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला. रेणूचा काही वर्षांपूर्वी साखरपुडा झाला होता, पण तिेनेच नंतर लग्न मोडलं होतं. 2023 मध्ये एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत, रेणूने खुलासा केला होता की, तिची मुलगी आध्या जी त्यावेळी सात वर्षांची होती, त्यामुळे तिने पुन्हा लग्नाच्या निर्णयावर पुनर्विचार केला."मी त्या लग्नाबद्दल काहीही बोलले नाही कारण हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे. पण, माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींचा कोणी गैरसमज करून घ्यावा असं मला वाटत नाही. म्हणून, मला ते स्पष्ट करायचं आहे. माझं कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत हा साखरपुडा झाला होता. . तेव्हा आध्या सात वर्षांची होती. मी ज्याच्याशी लग्न करत होते त्याच्यासाठी मला वेळ द्यायचा होता. तिच्याबद्दल विचार केल्यानंतर आणि तिला सांभाळण्यासाठी कोणीतरी आवश्यक आहे हे जाणून मी लग्न रद्द केले," असं रेणु देसाईने सांगितलं होतं.
पवन कल्याण यांनी रेणु देसाईंना घटस्फोट दिल्यानंतर रशियन मॉडेल-अभिनेत्री ॲना लेझनेवासह तिसरं लग्न केलं. 1997 मध्ये पवन कल्याण यांनी 19 वर्षीय नंदिनीशी लग्न केलं होतं. 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर 2009 मध्ये अभिनेत्री रेणू देसाईशी लग्न केलं आणि 2012 मध्ये घटस्फोट झाला. त्यांना अकिरा नंदन आणि आध्या ही दोन मुलं आहेत. ॲना लेझनेवाचा जन्म रशियामध्ये (1980) मध्ये झाला आहे. ती एक मॉडेल-अभिनेत्री आहे, 2011 मध्ये 'तीन मार' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिची पवन कल्याण यांच्याशी भेट झाली होती. दोन वर्ष डेट केल्यानंतर अखेर 30 सप्टेंबर 2013 रोजी ते विवाहबंधनात अडकले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.