Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

JCB ने सुरू होतं खोदकाम; अचानक जमिनीतून निघाला खजिना, उचलण्यासाठी लोकांची झुंबड

JCB ने सुरू होतं खोदकाम; अचानक जमिनीतून निघाला खजिना, उचलण्यासाठी लोकांची झुंबड

लखनऊ : एका गावात जेसीबीने शेतात खोदकाम करताना जमिनीखाली असं काही दिसलं की लोकांची गर्दी झाली. इथे एका भांड्यात मोठ्या प्रमाणात प्राचीन नाणी सापडली आहेत. नाणी सापडल्याची माहिती मिळताच प्रशासनाचे सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले. प्रशासकीय अधिकाऱ्यांना 168 प्राचीन नाणी सापडली. उत्खननादरम्यान सापडलेली काही नाणी घेऊन ग्रामस्थही पळून गेले. यानंतर अधिकाऱ्यांनी जेसीबी चालक आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर येथील बेल्हार पोलीस स्टेशन हद्दीतील लोहरौली मिश्रा गावात घडली आहे.

परवानगी न घेता जेसीबीच्या साह्याने बेकायदेशीरपणे माती खोदली जात होती. प्रथमदर्शनी ही नाणी मुघलकालीन असल्याचे दिसते. उर्दू आणि पार्शियन शब्दात मुघल सम्राटांची नावे नाण्यांवर लिहिली आहेत. नाणी सापडल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. नाण्यांचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. वास्तविक, चार दिवसांपूर्वी गावात जेसीबीच्या सहाय्याने शेतात खोदकाम सुरू होतं. दरम्यान, जेसीबी चालकाला जमिनीच्या आतून काहीतरी आदळल्याचा आवाज आला. यावेळी एक घागर दिसली. ही घागरी मुघल काळातील चांदीच्या नाण्यांनी भरलेली होती.

नाणी सापडल्याची बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. दरम्यान, संधीचा फायदा घेत काही जणांनी काही चांदीची नाणी आपल्या घरी नेली. दुसऱ्या दिवशी ही बाब मेहदवळ तहसील प्रशासनाला कळताच एसडीएमच्या सूचनेवरून प्रशासनाच्या लोकांनी घटनास्थळी पोहोचून 168 नाणी जप्त केली. ही नाणी सुमारे 500 वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते आणि त्यात पर्शियन-उर्दू शब्दांमध्ये मुघल सम्राटांची नावे आहेत. पुरातत्व विभाग जप्त केलेल्या नाण्यांची तपासणी करणार आहे.

मेहंदावलचे एसडीएम अरुण कुमार म्हणाले, जप्त केलेली नाणी सील करण्यात आली आहेत. ते तिजोरीत जमा केले जात आहेत. पुरातत्व विभागालाही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुरातत्व विभागाकडून चौकशी केली जाईल, त्यानंतरच नाण्यांबाबत स्पष्ट माहिती समोर येईल. जेसीबी चालकासह इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.