Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आर. माधवन आहे कोल्हापूरचा जावई :, तुम्हाला माहिती आहे का? काय आहे Love Story

आर. माधवन आहे कोल्हापूरचा जावई :, तुम्हाला माहिती आहे का? काय आहे Love Story 


'रहे ना हैं तेरे दिल में' हा सिनेमाबॉलिवूडच्या इतिहासात सुपरहिट सिनेमा म्हणून कोरला गेला आहे. आर. माधवन  आणि दिया मिर्झा  यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. इतकंच नाही तर या सिनेमामुळे माधवनला बॉलिवूडमध्ये स्वतंत्र ओळख मिळाली. विशेष म्हणजे स्मार्ट पर्सनालिटी, गोड स्माइल यामुळे आज तो लाखो तरुणींचा क्रश आहे. आजही त्याच्या प्रेमात असंख्य तरुणी आहेत. मात्र, साऊथचा हा हिरो चक्क एका मराठमोळ्या तरुणीच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला. 

आर. माधवन या नावाचा साऊथ इंडस्ट्रीत चांगलाच दबदबा आहे. इतकंच नाही तर त्याने बॉलिवूडमध्येही त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्याची वरचेवर चर्चा रंगत असते. सध्या नेटकऱ्यांमध्ये त्याची लव्हस्टोरी चर्चेत आली आहे. आर. माधवन याच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य तरुणी आहेत. पण, तो कोल्हापुरच्या एका मराठमोळ्या तरुणीच्या प्रेमात वेडा झाला. केवळ वेडाच झाला नाही तर त्याने तिच्याशी संसारही थाटला. त्यामुळेच त्याची लव्हस्टोरी जाणून घेऊयात.

आर. माधवनचे वडील टाटा स्टीलमध्ये मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह होते. त्यामुळे आपल्या मुलानेही इंजिनिअर होऊन याच कंपनीत काम करावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यानुसार, आर. माधवनने कोल्हापूरच्या राजाराम अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतलं. कॉलेज करत असतांनाच वयाच्या २२ व्या वर्षी तो कॅनडामध्ये क्लचरल अॅम्बेसेडर म्हणून भारताचं प्रतिनिधित्वही केलं. त्याने आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचं ट्रेनिंगही घेतलं होतं. मात्र, सहा महिन्यांनी वय कमी पडल्यामुळे त्याची आर्मीसाठी निवड झाली नाही. त्यानंतर त्याने कोल्हापुरातच पब्लिक स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोच म्हणून काम सुरू केलं.
कोल्हापुरात सुरु झाली माधवनची लव्हस्टोरी

कोल्हापूरमध्ये पब्लिक स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोच म्हणून काम करत असतांनाच त्याची ओळख सरिता बिर्जे हिच्यासोबत झाली. सरिताला एअर होस्टेस व्हायचं होतं. विशेष म्हणजे तिने एअर होस्टेसची परिक्षाही पास केली. त्यामुळे माधवनचे आभार मानण्यासाठी तिने त्याला घरी जेवायला बोलावलं. त्यानंतर त्यांच्यातली मैत्री वाढली आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. 

८ वर्ष केलं एकमेकांना डेट
जवळपास ८ वर्ष माधवन आणि सरिताने एकमेकांना डेट केलं. त्यानंतर त्यांनी १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली. तामिळ पद्धतीने या दोडीने लग्न केलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.