Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

WHOने सांगितली शिळे अन्न पुन्हा गरम करण्याची योग्य पद्धत; 99% लोक करतात ही एक चूक

WHOने सांगितली शिळे अन्न पुन्हा गरम करण्याची योग्य पद्धत; 99% लोक करतात ही एक चूक

भारतीय संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म मानले जाते. अन्न फेकून देणे म्हणजे जेवणाचा अपमान समजलो जातो. त्यामुळं लोक शिळे अन्न उरले तर ते पुन्हा गरम करुन खातात. पण काही जणांच्या म्हणण्यानुसार, जेवण पुन्हा गरम करुन खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेवण सतत गरम केल्याने त्यातील पोषकतत्व नाहीसे होतात. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील या बाबत माहिती दिली आहे. शिळे अन्न पुन्हा गरम कसे करायचे याबाबत WHOने माहिती दिली आहे.

WHOने दिलेल्या माहितीनुसार, शिजवलेले अन्न लगेचच तुम्हाला खायचे नसेल तर पुन्हा गरम करुन खाल्ले जाते. पण ते व्यवस्थित पद्धतीने गरम करणे गरजेचे आहे. या पद्धतीने जेवण पुन्हा गरम केले तर जेवण सेफ आणि हेल्दी राहिल. जर जेवण सतत गरम केले तर ते योग्य पद्धतीने पचत नाही. प्रोटीनयुक्त असलेले पदार्थ जसे की चिकन आणि अंडे पुन्हा गरम केल्यास प्रोटीनची संरचना बदलते. ज्याला प्रोटीन डिनेचुरेशन म्हटलं जातं. या प्रोसेसनंतर पोषक तत्वांची मात्राही कमी होते.

भात आणि पास्ता यासारखे पदार्थ शिजवल्यानंतर यात बॅक्टेरिया वाढू लागतातत. पुन्हा गरम केल्यानंतरही हे बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत आणि फूड बोर्न डिजीजचा धोका वाढतो. जर तुम्ही बटाटे किंवा ब्रेडपासून बनवलेले कोणतेही खाद्यपदार्थ पुन्हा गरम केल्यास ऍक्रिलामाइड तयार होते. हे कंपाऊंड तुम्हाला नकळत कर्करोगासारखे आजार जडू शकतात. तेलात तळलेले भजी किंवा पुरी हे पदार्थ वारंवार गरम केल्यास त्यांचा पोत, चव आणि कुरकुरीतपणा नष्ट होतो.

WHOच्या म्हणण्यानुसार तुम्ही खाद्यपदार्थ कमीत कमी 70 डिग्री सेल्सिअसवर रीहीट करु शकता. असं केल्याने त्यात तयार होणारे बॅक्टेरिया मारण्यास मदत होते. मात्र, ही प्रक्रिया फक्त एकदाच करावी. कारण अन्न सतत गरम केल्यासे अन्नाचा दर्जा आणि सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.

अन्न पुन्हा गरम करताना काय काळजी घ्याल!

जेवण पुन्हा गरम करायला घेताना त्यातील काही भाग हा सुका असतो. त्यामुळं गरम करण्याअगोदर त्यात थोडेसे पाणी शिंपडा. असं केल्याने त्याची चव टिकून राहते. अन्न शिल्लक राहिले असल्यास ते पुन्हा गरम करण्याऐवजी त्या अन्नापासून दुसरा एखादा पदार्थ बनवता आला तर बनवून पाहा. मायक्रोव्हेवमध्ये अन्न गरम करताना ते झाकून ठेवणे गरजेचे आहे. टायमर सेट करा आणि मध्ये मध्ये ते ढवळत राहा. 165 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचे तापमान पोहोटेपर्यंत गरम केले पाहिजे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. सांगली दर्पण याची पुष्टी करत नाही.)


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.