Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुदत संपायच्या 5 वर्षे आधीच UPSC च्या अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा, पूजा खेडकर प्रकरणाशी कोणताही संबंध नाही....

मुदत संपायच्या 5 वर्षे आधीच UPSC च्या अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा, पूजा खेडकर प्रकरणाशी कोणताही संबंध नाही....


केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) अध्यक्ष मनोज सोनी यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याला आणखी पाच वर्षे असताना तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे. मनोज सोनी 2017 मध्ये आयोगाचे सदस्य झाले, तर 16 मे 2023 रोजी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सोनी यांनी महिनाभरापूर्वीच आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारला जाईल की नाही हे स्पष्ट नाही. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय UPSC उमेदवारांनी नोकऱ्या मिळविण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे वापरलेल्या वादांशी संबंधित नाही. याबाबतचे वृत्त द हिंदूने दिले आहे.
UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांचा कार्यकाळ 2029 मध्ये संपत आहे. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. जून 2017 मध्ये सोनी UPSC सदस्य म्हणून रुजू झाले. 16 मे 2023 रोजी त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सोनी यांना गुजरातमधील स्वामिनारायण पंथाची शाखा असलेल्या अनुपम मिशनसाठी अधिक वेळ द्यायचा आहे. त्यामुळेच त्यांनी यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. जून 2017 मध्ये UPSC मध्ये सामील होण्यापूर्वी, मनोज सोनी यांनी त्यांच्या गृहराज्य गुजरातमधील दोन विद्यापीठांमध्ये तीन वेळा कुलगुरू म्हणून काम केले.

2005 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ 40 वर्षांचे असताना त्यांना वडोदरा येथील एमएस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त केले होते. ते हे पद भूषवणारी सर्वात तरुण व्यक्ती ठरले होते. मनोज सोनी यांनी 2015 पर्यंत दोन टर्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे (BAOU) कुलगुरू म्हणूनही काम पाहिले आहे.

मनोज सोनी यांच्या आईने 1978 मध्ये मुंबईहून गुजरातमधील आनंद येथे जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर संपूर्ण कुटुंब आनंदला आले. सोनी यांनी 11वी आणि 12वी आनंद शहरातून केली आहे. ते प्रथम बारावी विज्ञान शाखेत आला होते त्यात ते नापास झाले होते. यानंतर त्यांनी राजरत्न पीटी पटेल महाविद्यालयात कला शाखेतून शिक्षण घेणे पसंत केले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मनोज सोनी यांनी एमएस युनिव्हर्सिटी, वडोदरा येथून बीए आणि एमएचे शिक्षण घेतले. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास केला.
याशिवाय मनोज सोनी यांनी सरदार पटेल विद्यापीठ, वल्लभ विद्यानगर येथून आंतरराष्ट्रीय संबंधांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दोनदा यूपीएससीची परीक्षाही दिली आहे. पहिल्याच प्रयत्नात ते अपयशी ठरला होता. दुसऱ्या प्रयत्नात ते परीक्षा उत्तीर्ण झाले पण मुलाखतीत नापास झाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.