Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'पत्नीला आणि तिच्या प्रियकराला कापून आलोय', रक्ताने हात माखलेला, पोलीसही हादरले

'पत्नीला आणि तिच्या प्रियकराला कापून आलोय', रक्ताने हात माखलेला, पोलीसही हादरले

सध्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरची बरीच प्रकरण समोर येत आहेत. या विवाहबाह्य संबंधांमुळे चांगले सुखी, संसार उद्धवस्त होत आहेत. विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर भांडण आणि घटस्फोटाने विषय संपतो. पण काही प्रकरणात अत्यंत टोकाचा हिंसाचार झाल्याची उदहारण आहेत. यात नवरा, बायको किंवा तिसरी व्यक्ती यापैकी एकाचा बळी जातोय. असच एका हादरवून सोडणारं प्रकरण समोर आलय. एका युवकाने पत्नी आणि तिच्या प्रियकराला आपल्याच घरातील खोलीत पाहिलं. तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पत्नीच हे रुप त्याला सहन झालं नाही. त्याचं डोकं फिरलं.

त्याने घरात असलेली कुऱ्हाड उचलली व दोघांची कापून हत्या केली. त्यानंतर आरोपी तिच कुऱ्हाड हातात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याचा सगळा हात रक्ताने माखलेला होता. ‘मी पत्नी आणि तिच्या प्रियकराला कापून आलोय’ असं त्याने पोलिसांना सांगितलं. मध्य प्रदेशच्या दतिया जिल्ह्यातील हे प्रकरण आहे.

खोलीतील दृश्य पाहून हैराण

हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:ला पोलिसांकडे सरेंडर केलं. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवून दिले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी खोलीतील दृश्य पाहून हैराण झाले. चिडलेल्या नवऱ्याने अत्यंत क्रूरतेने दोघांची हत्या केली होती. त्यांनी आरोपीला हत्येच कारण विचारलं, त्यावेळी त्याने सर्व सांगितलं. आधीपासूनच पत्नीवर विवाहबाह्य संबंधांचा संशय होता, असं त्याने सांगितलं.

प्रियकर पत्नीचा नातेवाईक

आरोपी मध्य प्रदेशच्या सिविल लाइन भागातील बाग गावचा राहणारा आहे. पोलीस चौकशीत त्याने सांगितलं की, “पत्नी पूजा वंशकारच तिच्या दूरच्या नातेवाईकासोबत प्रेम प्रकरण सुरु होतं. त्याला संशय होता. पत्नी आणि तिच्या नातेवाईकाला आपल्याच घरातील खोलीत पाहिल्यानंतर संशयावर शिक्कामोर्तब झालं”

दाखवण्यासाठी पती घरातून निघाला, पण….

गुन्हा घडला त्या दिवशी नवऱ्याने पूजाच्या नातेवाईकाला घराच्या आसपास फिरताना पाहिलं. त्यानंतर काही वेळाने पूजाने पतीला मार्केटमध्ये जायला सांगितलं. नवऱ्याला आधीपासूनस संशय होता. त्यामुळे दाखवण्यासाठी पती घरातून निघाला. पण तो मार्केटला गेलाच नाही. थोडावेळा इथे तिथे फिरुन अचानक घरी आला. घरी आला, त्यावेळी आतून दरवाजा बंद होता. बराचवेळ त्याने कडी वाजवली. घराच्या आत गेल्यानंतर बेडरुममध्ये पत्नीला नातेवाईकासोबत पाहिलं. त्यावेळी त्याच्या रागाचा पारा चढला. त्याने थेट दोघांना संपवण्याच टोकाच पाऊल उचललं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.