Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बापरे! मिठाईचे दुकान की ' विषारी गँगचीं कॉलनी ' काय होतते जाणून घ्या

बापरे! मिठाईचे दुकान की ' विषारी गँगचीं कॉलनी ' काय होत जाणून घ्या 


पाटणा : मिठाईच्या दुकानात वेगवेगळया प्रकारच्या मिठाई पाहायला मिळतात. काही प्रकरणं अशी आहेत जिथं तुम्ही अशा दुकानात उंदीर फिरताना, माशा भिरभिरताना पाहिलं असेल पण एका मिठाईच्या दुकानात असं काही दिसलं की कुणी विचारही केला नसेल.

बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील बहादूरगंज ब्लॉक अंतर्गत बासबारी हाट येथील हे मिठाईचं दुकान. य दुकानातून 25 ते 30 किंग कोब्रा साप बाहेर काढण्यात आले आहेत. इतके साप आणि धोकादायक, पाहून लोक घाबरले. मिळालेल्या माहितीनुसार, कैसर नावाच्या स्थानिक व्यक्तीचं हे मिठाईचं दुकान आहे. सुरुवातीला इथं 4-5 साप रेंगाळताना दिसले. यानंतर दुकान मालक आणि ग्राहकांमध्ये घबराट पसरली.

25-30 साप सापडले 
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठा जमाव जमला. दरम्यान, दुकान मालकाने सर्पमित्रांना बोलावून घेतले. यानंतर सर्पमित्रांनी तीन ते चार तास अथक परिश्रम करून सुमारे 25 ते 30 साप पकडले. त्यांना प्लास्टिकच्या पेटीत ठेवण्यात आलं. या प्रकरणात सापामुळे कोणालाही दुखापत झालेली नाही.
मिठाईचं दुकान बनली कोब्रा कॉलनी 

एवढ्या आलिशान घराच्या दुकानात कोब्राची पिल्लं कशी काय दिसली हे पाहून आम्ही स्वतः थक्क झालो आहोत असं सर्पमित्रानं सांगितलं. साप काढण्यात आल्याने ती जागा चर्चेचा विषय बनली आहे. किंबहुना स्थानिक लोक त्याला 'कोब्रा कॉलनी' म्हणू लागले आहेत. एका नागाने अंडी घातली असेल तर 30 ते 35 असू शकतात आणि जर दोन नागांनी अंडी घातली असेल तर दुप्पट साप लपून राहू शकतात, असें सर्पमित्रान सांगितलं.

सापांपासून सावधान!
पाऊस सुरू होताच सापांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी दररोज साप दिसून येत आहेत, त्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे.सोबतच अशा विषारी सापांच्या चाव्यामुळे आपण कोणत्याही प्रकारच्या भूतबाधात पडू नये, याची जाणीव सर्पप्रेमींनी लोकांना करून दिली. सर्पदंश झाल्यास थेट रुग्णालयात जा. एवढ्या

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.