Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कारागृहात आल्यावर गुन्हेगाराचा उंदीर होतो :, अमिताभ गुप्ता

कारागृहात आल्यावर गुन्हेगाराचा उंदीर होतो :, अमिताभ गुप्ता 


पुणे : बाहेर कोणीही कितीही मोठा गुन्हेगार असो, तो कारागृहात आल्यानंतर उंदीरच होतो. शहर शांत व स्वच्छ ठेवण्यासाठी ज्या गुन्हेगारांना कारागृहात टाकले, त्यांनाच शिस्त लावण्याची जबादारी माझ्यावर आली. अशी डबल ड्युटी मला करावी लागल्याचे भाष्य राज्याचे अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने गुप्ता यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

गुप्ता म्हणाले की, पुणे पोलीस आयुक्त आणि कारागृह महानिरीक्षक म्हणून मला भरपूर शिकायला मिळाले. ज्या बाबतीत कारागृहावर टीका झाली त्या गोष्टीच होऊ नये, यासाठी माझ्याकडून प्रयत्न झाले. कैद्यांची मानसिकता बदलण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना केल्या. कैद्यांना गरम पाणी, फोनची सुविधा, वॉशिंग मशीन, टिव्ही, वॉटर कुलर, सुविधा पुरवली गेली. यात अमेरिकेच्या धर्तीवर येरवडा कारागृहातील वॉशिंग मशीन ही संकल्पना खूप चर्चेत आली.

कँमेऱ्यांची कैद्यांवर नजर
कारागृहात गडबड होत असते, त्यावरून विनाकारण बदनामी होते. त्यामुळे कारागृहातील गैरप्रकार थांबविण्यासाठी हाय डेफिनेशनचे ९०० कॅमेरे बसविले आहेत. त्यांची नजर कैद्यांवर आहे. कॅमेर्‍याच्या चित्रीकरणात ज्याची चुकी त्यालाच जबाबदार धरले जात आहे.
फोनची सुविधा सुरू

कारागृहात सर्वाधिक चर्चेत आलेला व सातत्याने गैरप्रकार समोर येणारा प्रकार म्हणजे, कैद्यांजवळ मोबाईल सापडणे. पण, यामुळे कारागृहाची प्रतिमा मलिन होत होती. त्यामुळे या गोष्टींना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली. त्यासोबतच कैद्यांना फोनची सुविधा पुरविली. कैद्यांना कारागृतून बाहेर पडल्यानंतर फायदा व्हावा यासाठी त्यांचे श्रमिककार्ड, आयुश्यमान कार्डही काढले असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

गुन्हेगारी मोडून काढण्याचा प्रयत्न
शहरातील गुन्हेगारी मोक्का आणि इतर कारवाईद्वारे मोडून काढण्याचा प्रयत्न झाला. गुन्हेगारांसाठी येरवडा किंवा शहर सोडा ही टॅग लाईन पुणे पोलिस आयुक्त असताना प्रसिध्द झाली होती. माझ्यावर शहरानंतर येरवडा कारागृहाची जबाबदारी आली. आता मला शहर आणि येरवडा दोन्ही बाबी सोडून जावे लागत आहे, असेही गुप्ता मिश्किलपणे म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.