Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मनोज जरांगेच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अजय बारसकरांची गाडी जाळली :, पंढरपुरातील घटना

मनोज जरांगेच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अजय बारसकरांची गाडी जाळली :, पंढरपुरातील घटना 


सोलापूर- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेणारे अजय बारसकर यांची चारचाकी गाडी जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. बारसकर आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले होते. तेव्हा त्यांची गाडी अज्ञातांनी जाळली आहे. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. सुरुवातीला ते मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. पण, काही गोष्टी संशयास्पद वाटल्याने मी वेगळी भूमिका घेतली असल्याचं बारसकर यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 
मिळालेल्या माहितीनुसार, अजय बारसकर आषाढी वारीनिमित्त पढंरपुरात गेले होते. यावेळी अज्ञातांनी त्यांची गाडी जाळली आहे. चारचाकी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. अजय बासरकर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केलीये. गाडी कोणी जाळली याबाबत काही समजू शकलेलं नाही. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

रात्रीच्या सुमारास पंढरपुरमध्ये त्यांची गाडी एका ठिकाणी पार्क करण्यात आली होती. त्यावेळी कार पेटवून देण्यात आली. तेथील लोकांच्या हे लक्षात येताच काहींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा फायदा झाला नाही. कार आगीमध्ये भस्मसात झाली. अजय बारसकर यांची यासंदर्भात प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
अजय बारसकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्याने ते अचानक चर्चेत आले होते. त्यांनी जरांगेंच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर अजय बारसकर आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची फेरी झडली होती. जरांगेंच्या बाजूने असलेले अनेक कार्यकर्ते बारसकर यांच्यावर नाराज होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.