Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

UPSC कडून पूजा खेडकरवर मोठी कारवाई

UPSC कडून पूजा खेडकरवर मोठी कारवाई 


वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना युपीएससीने कारणे दाखवा नोटिस बजावली असून त्यांची प्रशिक्षणार्थी अधिकारीपदाची निवड रद्द केली आहे. युपीएससीकडून पूजा खेडकरचा सखोल तपास करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अमाप संपत्ती असताना ओबीसी कोट्यातून दिलेली युपीएससी परिक्षा आणि सादर केलेलं खोटं दिव्यांग प्रमाणपत्र या सगळ्यामुळे पूजा खेडकर यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान, आता युपीएससीने पूजा खेडकर यांच्याविषयी तपास केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

युपीएससीने नागरी सेवा परीक्षा २०२२ साठी तात्पुरत्या शिफारस केलेल्या पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाची सविस्तर आणि सखोल चौकशी केली. या तपासणीतून पुढे आलेल्या माहितीनुसार, त्यांनी फसवणूक करून परीक्षा नियमांनुसार परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रयत्न केले. तसेच तिचे नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव, तिचा फोटो/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून ओळख बदलून फसवणूक केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.