Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हाच तो बदलापूरचा नराधम, 2 मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेची संपूर्ण कुंडली

हाच तो बदलापूरचा नराधम, 2 मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेची संपूर्ण कुंडली
 

बदलापूर : बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको केला. सकाळपासून सुरू असलेलं हे आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरू होतं.

आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे. तसंच बदलापूर बंदही करण्यात आलं आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीबाबतची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदेला अटक केली आहे.

आरोपी अक्षय शिंदे याचं वय 24 वर्षांचं असून त्याला सफाईसाठी नेमलेल्या कंपनीने कामावर ठेवलं होतं. आरोपी अक्षय शिंदे 1 ऑगस्टला शाळेत कामावर लागला होता. अक्षय शिंदे हा सफाई कर्मचारी होता. अक्षयने 12 तारखेला एका मुलीचा विनयभंग केला त्यानंतर त्याने 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. पीडित मुलीने प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचं घरच्यांना सांगितलं, त्यानंतर पालक तिला डॉक्टरकडे घेऊन गेले, तेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर इजा झाल्याचं सांगितलं. यानंतर पालकांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं मात्र रात्री 12 वाजेपर्यंत पोलिसांनी पालकांना बसवून ठेवलं. मनसेने याबाबत आवाज उठवायला सुरूवात केल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली. यानंतरही पोलिसांनी पाहिजे तसा तपास केला नाही, असा आरोप केला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आंदोलकांनी शांतता राखावी असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी केलेल्या या दिरंगाईबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईमध्ये विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि हेड कॉन्सटेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिला आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.