अंबरनाथमध्ये 'हीट अँड रन'पेक्षा भयानक घटना, कारने 5 जणांना ठरवून चिरडलं
अंबरनाथ: अलीकडे मुंबई आणि पुण्यामधील हीट अँड रन्स प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला होता. हीट अँड रन प्रकरणामध्ये निष्पाप लोकांचा जीव गेला. अशातच आता अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटनासमोर आली आहे.
एका कारने पाच जणांना उडवल्याची घटना घडली आहे. जुन्या वादातून ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधील जांभूळफाट्याजवळ ही घटना घडली आहे. मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे. टाटा सफारी या एसयुव्हीने एका पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारचा पाठलाग केला होता. जेव्हा फॉर्च्युनर ही रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्यानंतर या टाटाच्या कारने पाठीमागून येऊन जोराची धडक दिली. फॉर्च्युनरला धडक दिल्यानंतर एका व्यक्तीला कारने फरफटत नेलं. यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ४ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या दोन्ही गाड्यामध्ये कोण होतं, हा अपघात का झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. या घटनेची अधिक तपास पोलीस करत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.