Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रात भाजपला ६२, काँग्रेसला ८५; विधानसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, सर्व्हेचा अंदाज

महाराष्ट्रात भाजपला ६२, काँग्रेसला ८५; विधानसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, सर्व्हेचा अंदाज
 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर काँग्रेसने देखील अंतर्गत सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार मविआमधील कोणता पक्ष किती जागा मिळणार याबाबतचा अंदाज समोर आला आहे.

साम टीव्हीच्या हाती काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेची माहिती लागली आहे. काँग्रेसच्या  या प्राथमिक सर्व्हेनुसार राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या सर्व्हेनुसार सर्वाधिक जागा ८०-८५ जागा काँग्रेसला मिळण्याचा अंदाज आहे.

काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसला ८० ते ८५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. शरद पवारांच्या पक्षाला ५५ ते ६० जागा तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ३० ते ३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर या सर्व्हेनुसार भाजपला ६०-६२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना शिंदे गटाला ३०-३२ तर अजित पवारांच्या पक्षाला ८-९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या या प्राथमिक सर्व्हेत महाविकास आघाडीची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महायुती-महाविकासआघाडीच्या राजकारणात अजून एका नव्या प्रयोगाची नांदी होत आह. महाराष्ट्र विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी संभाजी छत्रपतींचा पुढाकार असणार आहे. आघाडीच्या दृष्टीने आज मुंबईत महत्वाची बैठक होणआर आहे. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे. स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर आणि इतर छोट्या पक्षांची मिळून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणूकीत भाजपचं मिशन १२५ सुरू आहे. राज्यातील ५० जागा भाजपने निश्चित केल्या आहेत. या जागांवर भाजप सहज निवडून येऊ शकतात. मात्र, इतर ७५ जागांवर निवडून आणण्यासाठी भाजपकडून विशेष रणनीती आखली जात आहे. या ७५ जागा निवडून आणण्याची राज्यातील बड्या नेत्यांवर जबाबदारी आहे. प्रत्येक बड्या नेत्यावर विधानसभेचे ७-८ मतदारसंघाची जबाबदारी देण्याचं नियोजन आहे. त्या नेत्यांनी आपला अहवाल नेतृत्त्वाकडे द्यायचा आहे. भाजपकडून त्या त्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.