Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटकसव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, विश्रामबाग पोलिसांची कारवाई

चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, विश्रामबाग पोलिसांची कारवाई
 

सांगली :  शहरातील वारणाली परिसरात महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा देऊन चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सव्वा लाखांचे दागिने, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.

हबीब दिलावर शेख (वय १९, रा. हनुमाननगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. २२ आगस्ट रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास वारणालीतील रंजना पाटील यांच्या गळ्यातील दागिने अज्ञाताने हिसडा मारून जबरदस्तीने चोरून नेले होते. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चोरट्याचा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शोध घेत होते.

 
पथकातील बिरोबा नरळे, आर्यन देशिंगकर, योगेश पाटील यांना ही चोरी हबीब शेख याने केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १० ईएफ ८०५३) जप्त करण्यात आली.

 
विश्रामबागचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक चेतन माने, स्वप्नील पोवार, संजय अस्वले, बिरोबा नरळे, संदीप साळुंखे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, योगेश पाटील, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.