Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साताऱ्यामध्ये तरूणाच्या त्रासाला कंटाळत अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन

साताऱ्यामध्ये तरूणाच्या त्रासाला कंटाळत अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन
 

साताऱ्यातील एका अल्पवयीन मुलीने तरूणाच्या जाचाला कंटाळून टोकाचा निर्णय घेतला आहे. या घटनेने सातऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. पोवई नाक्यावर पोलीस आणि मुलीच्या नातेवाईकांमध्ये झटापट झाली.

साताऱ्यामध्ये काही दिवसापासून संशयित आरोपी हा पीडित मुलीला वारंवार त्रास देत होता. त्रासाला कंटाळून या मुलीने आणि तिच्या नातेवाईकांनी या तरुणाचा विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने त्या तरुणावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला अटक करण्यात आले होती. मात्र काही दिवसांपूर्वी जामिनावर मुक्तता झालेल्या या तरुणाने पुन्हा या मुलीला आणि तिच्या घरातील लोकांना धमकी दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
मुलीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला अटक केली आहे. पोवई नाक्यावर मुलीच्या नातेवाईकासह काही लोक एकत्र आल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस आणि नातेवाईक यांच्यामध्ये झटापट देखील झाली. मात्र पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात घेऊन सर्व बाजू समजावून घेतलीय.

दरम्यान, समाजात अत्याचाराच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. प्रत्येकाने आपल्या घरातील आई-बहिणीप्रमाणे आजूबाजूच्या महिलांची काळजी घ्यायला हवी. जेणेकरून समाजात मोकाटपणे फिरणाऱ्या नराधमांची हिंमत होणार नाही. महिलांनीही स्वत: अलर्ट राहिलं पाहिजे, कोणी आपल्याला त्रास देत असेल तर वेळीच घरात सांगून त्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला हवी.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.