रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडांवरील रंगांचा अर्थ माहीत आहे का?
माईल स्टोन म्हणजेच मैलाचा दगड. हा दगड तुम्हाला महामार्गावरून अथवा कोणत्याही रस्त्यावरून प्रवास करताना दिसतो.
माईल स्टोनवर तुम्हाला वेगवेगळे रंग दिसतील आणि त्यावर किती किलोमीटर आणि तुम्ही कोणत्या रस्त्यावर आहात हे तुम्हाला दिसेल.
माईल स्टोनवर जर तुम्हाला पिवळा आणि पांढरा रंग दिसला तर तुम्ही नॅशनल हायवे म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर आहात.
माईल स्टोनवर जर तुम्हाला हिरवा आणि पांढरा रंग दिसला तर तुम्ही स्टेट हायवे म्हणजेच राज्य महामार्गावर आहात.
माईल स्टोनवर जर तुम्हाला काळा आणि पांढरा रंग दिसला तर तुम्ही सीटी रोड म्हणजेच शहरातील मार्गावर आहात.
माईल स्टोनवर जर तुम्हाला नारंगी आणि पांढरा रंग दिसला तर तुम्ही पंतप्रधान रस्ते योजना असलेल्या रस्त्यावर आहात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.