Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

या' प्रसिद्ध अभिनेत्याचा तुरुंगात शाही बडदास्त ; चहा पिताना, सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल

'या' प्रसिद्ध अभिनेत्याचा तुरुंगात शाही बडदास्त ; चहा पिताना, सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल
 

जेलरने परवानगी दिली तरच दर्शनला भेटता येते. तपासात सर्व काही बाहेर येईल. मोबाईल वापरण्याची परवानगी कोणी दिली? त्याला सिगारेट कशी मिळाली? याची चौकशी केली जाईल.

बंगळूर : चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खूनप्रकरणी  तुरुंगात असलेला अभिनेता दर्शन  याला शाही वगणूक देण्यात येत असल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर परप्पन अग्रहाराच्या सात अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

पत्रकारांशी बोलताना राज्याचे गृहमंत्री परमेश्वर  म्हणाले की, राज्यातील सर्व कारागृहांमध्ये सीसीटीव्ही आणि जॅमर लावले आहेत. मात्र, अशा घटना घडल्यास अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे काम करण्याची गरज आहे. अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून अशा घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे.

दर्शनाला तुरुंगात चिकन बिर्याणी
ते म्हणाले, ''तुरुंगातील दर्शनला पाहुणचारप्रकरणी सात अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जेलर शरणबसवा अमिनागडा, प्रभू एस. कंदेवाल, तिप्पेस्वामी, श्रीकांत, वेंकाप्पा कोरथी, संपतकुमार कडपट्टी, बसप्पा थेली यांना निलंबित केले आहे. घटनेचा अहवाल मागवला आहे. या प्रकरणात वरिष्ठांचा थेट सहभाग असेल तर त्यांनाही निलंबित केले जाईल. अहवाल आल्यानंतर त्यावर कारवाई करू. यामध्ये कोणतीही गय केली जाणार नाही. कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात भेदभाव केला जाणार नाही. यापूर्वी दर्शनाला तुरुंगात चिकन बिर्याणी दिल्याचे वृत्त आले होते; पण आता शाही पाहुणचाराची घटना समोर आली आहे. याचे समर्थन करत नाही.''

कारागृहात यापूर्वीच जॅमर लावला आहे. तथापि, त्याची वारंवारता जास्त असल्यास त्यामुळे शेजाऱ्यांना त्रास होतो. त्यासाठी आम्ही वारंवारता कमी केली आहे. चहा पिताना आणि सिगारेट ओढताना दर्शनाचा फोटो कोणी काढला? कारागृहात मोबाईल कसा आला? ज्या मोबाईलवर फोटो काढला, त्याची चौकशी करू, असे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार

जेलरने परवानगी दिली तरच दर्शनला भेटता येते. तपासात सर्व काही बाहेर येईल. मोबाईल वापरण्याची परवानगी कोणी दिली? त्याला सिगारेट कशी मिळाली? याची चौकशी केली जाईल. कारागृहात २४ तास सीसीटीव्ही सुरु आहेत. कोणत्या बॅरेकमध्ये काय होते, ते सीसीटीव्हीमध्ये पाहता येते. हे खरे असल्यास कर्तव्यात कसूर केलेल्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आपल्यावर कोणताही दबाव नाही. मात्र दर्शन आणि टोळीतील सदस्यांना दुसऱ्या कारागृहात हलविण्याचा विचार सुरू असल्याचेही परमेश्‍वर यांनी सांगि

कारागृहाचे मुख्य अधीक्षक, अधीक्षकही निलंबित
चित्रदुर्गातील रेणुकास्वामी खून प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला अभिनेता दर्शन याला पाहुणचार दिल्याप्रकरणी परप्पन अग्रहार मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य अधीक्षक व्ही. शेषमूर्ती, अधीक्षक मल्लिकार्जुन स्वामी यांना सोमवारी निलंबित करण्यात आले. सात अधिकाऱ्यांना यापूर्वीच निलंबित केले आहे. त्यामुळे निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची संख्या आता नऊ झाली आहे. या प्रकरणात आणखी अधिकारी सहभागी असल्याचे आढळून आल्यास त्यांनाही निलंबित करण्यात येईल, असे गृहमंत्री परमेश्‍वर यांनी सांगितले. 

वरिष्ठ आयपीएस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करतील. अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल. अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह आणि सुधारात्मक सेवा) मालिनी कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, दर्शन याच्यावर कारागृह परिसरात मोबाइल फोनचा वापर, सिगारेट ओढणे आणि कारागृहात या वस्तूंची तस्करी याप्रकरणी आणखी नवीन तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
दर्शनला हिंडलगा कारागृहात हलविणार?

बंगळूर : रेणुकास्वामी खूनप्रकरणी परप्पन अग्रहार तुरुंगात आरोपी अभिनेता दर्शन याला शाही पाहुणचार दिल्याच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता प्रशासनाने दर्शनला हिंडलगा (बेळगाव) मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच दर्शन आणि त्याच्या साथीदारांनाही राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात पाठविले जाणार आहे. मात्र, याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. दर्शन सध्या बंगळुरातील परप्पन आग्रहार कारागृहात आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दर्शन व त्याच्या साथीदारांची राज्यातील विविध कारागृहात हलविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, त्यांनी डीजीपींना अग्रहार कारागृहाला भेट देऊन अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान, कारागृह विभागाने दर्शनला कारागृहात सिगारेट ओढण्यास आणि कॉफी पिण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. बंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सोमवारी ही माहिती दिली. एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात कॉफीचा मग घेऊन बॅरकच्या बाहेर खुर्चीवर बसलेला दर्शनचा फोटो रविवारी समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. फोटोमध्ये दर्शनचा व्यवस्थापक आणि तुरुंगातील इतर दोन कैदीही त्याच्यासोबत बसलेले दिसत होते.

कोणतीही दयामाया न ठेवता कारवाई
या घटनेनंतर कारागृह महासंचालक मालिनी कृष्णमूर्ती यांनी बंगळूर परप्पन अग्रहार कारागृहामधील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि मध्यरात्रीपर्यंत चौकशी करण्यात आली. अहवाल येताच कारागृह अधीक्षकांची बदली केली जाईल, असे परमेश्वर यांनी सांगितले. यात वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कोणतीही दयामाया न ठेवता कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. पोलिस विभागाने दोन दिवसांपूर्वी कारागृहावर छापा टाकला होता. त्यावेळी एकही मोबाईल जप्त करण्यात आला नाही. या संदर्भातही तपास सुरू आहे. कारागृहातील गेल्या १५ दिवसांचे फुटेज तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दर्शनच्या प्रकरणात सरकारवर काही दबाव होता का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी कोणत्याही दबावापुढे झुकण्याचा प्रश्नच येत नसल्याचा पुनरुच्चार केला. या प्रकरणातील आरोपींवर दोषारोपपत्र सादर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर दर्शन जामिनासाठी अर्ज करण्याच्या तयारीत होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.