Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आधी बेदम मारहाण मग दिले गरम चाकूने गुप्तांगावर चटके, वसईत आईकडून मुलांचा छळ

आधी बेदम मारहाण मग दिले गरम चाकूने गुप्तांगावर चटके, वसईत आईकडून मुलांचा छळ
 

चिमुकल्यांसाठी ती फक्त आई होती. त्यांच्या पंखांना बळ देणारी, त्यांची स्वप्न पूर्ण करणारी त्यांना तिच्या पदरातल्या मायेची उब हवी होती. मात्र त्या बदल्यात त्यांना सतत यातना सहन कराव्या लागल्या.

त्यांच्या इवल्याशा मनावर रोज चटके उठत होते. छळाचे ओरखडे बालमनावर ओढले जात होती. याची तसूभरही कल्पना या दोन चिमुकल्यांच्या वडिलांना नव्हती. वईसतील एक गावातून आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

वसईच्या वालीव पोलिस ठाण्याच्या हद्दीत आईने 7 आणि 8 वर्षांच्या चिमुकल्यांना अमानुष मारहाण करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्या मुलांसाठी ती आईच होती. मात्र आईसाठी मुलं सावत्र होती हा फरक होता. या सावत्र आईनं मुलांच्या गुप्तांगानाही गरम चाकूने चटके दिले. मुलं यातनेनं विव्हळत होती. मात्र या आईला त्या मुलांचा आक्रोश दिसलाच नाही ती चटके देत राहिली.

या दोन चिमुकल्यांचे बाबा कामानिमित्ताने घराबाहेर जास्त राहायचे. त्यामुळे घरात हा इतका भयंकर प्रकार सुरू आहे याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. ज्या वेळी आरोपी महिलेचा पती घरी आला तेव्हा त्याला मुलांचं वागणं संशयास्पद वाटलं. त्यावेळी त्याने लाडीगोडी लावून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार उघड झाला.

मुलांच्या अंगावर चटक्यांचे वळ पाहून वडिलांना मोठा धक्का बसला. वडिलांनी तातडीनं आरोपी पत्नीविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं असून करून चौकशी सुरू आहे. आरोपी महिला या मुलांना फक्त सावत्र मुलं असल्यानेच चटके देत होती की त्यामागे आणखी काही कारण होतं याचा तपास पोलीस करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.