जळगावमध्ये डॉक्टरला फ्रॅक्चर होईपर्यंत तरूणांची मारहाण, नेमकं काय घडलं?
जळगावमधील अयोध्या नगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 45 वर्षीय
डॉक्टरला मारहाण करताचा व्हिडीओ समोर आला आहे. डॉक्टरला रक्त येईपर्यंत सात
ते आठ जणांनी मारहाण केलीये. शुल्लक कारणावरून तिथे असलेल्या तरूणांनी
डॉक्टरला मारहाण केली.
डॉक्टरांना मारहाण होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.
मेडिकल समोर उभ्या तरुणांना शिवीगाळ करू नका अस डॉक्टर बोलल्याचा राग
आल्याने आठ ते दहा तरुणांनी बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या
बेदम मारहाणीत डॉक्टर जखमी असून नाक आणि हाता पायाचे हाड फ्रॅक्चर झाले
असून डॉक्टरवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठ ते दहा जणांचा
टोळक्याकडून बेदम मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ समोर आला आहे. आठ ते
दहा जण तरुण एका डॉक्टरला नाका तोंडातून रक्त निघे पर्यंत मारहाण करत
असल्याचा व्हीडिओ मध्ये दिसत आहे.
या घटनेप्रकरणी जखमी डॉक्टर योगेश बसे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 ऑगस्ट रोजी एकीकडे हॉटेलमध्ये गोळीबाराची घटना घडली असताना दुसरीकडे डॉक्टरला बेदम मारहाण झाल्याच्या या घटनेने पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.