Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यातील गोल्ड भक्त! २५ किलो सोनं घालून पोहोचले तिरुपतीच्या दर्शनाला, नंतर...

पुण्यातील गोल्ड भक्त! २५ किलो सोनं घालून पोहोचले तिरुपतीच्या दर्शनाला, नंतर...
 

तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी देशासह जगभरातून भाविक दररोज येत असतात. अनेक सेलिब्रिटींचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होतात. पण, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने सगळ्यांचेच डोळे विस्फारले गेले. व्हिडीओत दिसणारे हे भक्त पुण्यातील असून, ते २५ किलो सोन्याचे दागिने घालून तिरुपतीच्या दर्शनाला आल्याने त्यांच्याबद्दल सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारं कुटुंब पुण्यातील आहे. सनी नानासाहेब वाघचौरे, संजय गुजर अशी या दोन्ही व्यक्तींची नावे असून, त्यांना गोल्डन बॉय म्हणून ओळखले जाते.

सोन्याचा चष्मा, सोन्याची साखळी, बांगड्या, ७ नंबर असलेली साखळी आणि नाना असे नाव असलेली एक साखळी अशा सोन्याचे दागिने घालून जेव्हा हे चौघे दर्शनासाठी आले, तेव्हा त्यांच्या मागे पुढे पोलीस तैनात होते.

सनी वाघचौरे, संजय गुजर आणि त्यांच्यासोबत एक महिला व मुलगा आहे. चौघांच्याही अंगावर सोन्याचे दागिने दिसत आहे. चौघेही जेव्हा तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले. इतर भाविक त्यांना बघतच राहिले.

दर्शन घेतल्यानंतर बाहेर येत असताना अनेकांनी त्यांना सेल्फी घेण्यासाठी गराडा घातला. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकांची भंबेरी उडाली. देवस्थान सुरक्षा रक्षकांनाही त्यांना गर्दीतून बाहेर काढताना कसरत करावी लागली.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, 'आयकर विभागाची तुम्हाला पाहतोय.' तर 'देवासमोर असे प्रदर्शन का करायचा? असा प्रश्न दुसऱ्या एक युजरने केला आहे.

सनी वाघचौरे हे उद्योजक आणि चित्रपट निर्माते आहेत. संजय गुजर हे बांधकाम उद्योगात असून, चित्रपट निर्मितीतही अर्थ पुरवठा करतात. 25 किलो म्हणजे तब्बल 16 कोटी 88 लाख 17 हजार 875 रुपयांचे सोन्याचे दागिने घालून देवदर्शन घेतल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.