Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सौमित्र, पौलमी आणि आता डॉक्टर! RG मेडिकल कॉलेजमधल्या 'पॉर्न राज'विरोधात जाणाऱ्यांचा होतोय रहस्यमयी मृत्यू?

सौमित्र, पौलमी आणि आता डॉक्टर! RG मेडिकल कॉलेजमधल्या 'पॉर्न राज'विरोधात जाणाऱ्यांचा होतोय रहस्यमयी मृत्यू?
 

कोलकाता येथील आरजी मेडिकल कॉलेज सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. येथे एका ३१ वर्षीय डॉक्टरचा संशयास्पदरित्या मृत्यू होतो... या घटनेनंतर मेडिकल कॉलेज हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं सांगतं.... मात्र नंतर प्रकरण पेटतं आणि हा सामुहिक बलात्कार आणि हत्येचा प्रकार असल्याची धक्कादायक माहिती समोर येते....आता या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. देशभरातून या घटनेतील आरोपींना कडक शिक्षेची मागणी केली जात आहे.

कोलकता या प्रकरणाच्या निषेधात जगभरात आंदोलने, निषेध मोर्चे काढले जात आहेत. डॉक्टरांकडून न्यायाची मागणी केली जात आहे. मात्र यादरम्यान आरजी मेडिकल कॉलेजमध्ये काहीतरी दडवलं जात असल्याचं बोललं जात आहे. कारण या कॉलेजात असा धक्कादायक प्रकार पहिल्यांदाच होत नाहीये, यापूर्वी देखील अशी प्रकरणे येथे समोर आली आहेत. पण ती तेथेच दाबली गेली.

ट्रेनी डॉक्टरच्या हत्येनंतर २४ वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या आठवणी ताज्या केल्या जात आहेत, ती घटना देखील अशीच होती. नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार, २५ ऑगस्ट २००१ साली एक चौथ्या वर्षात शिकत असलेला मेडिकलचा विद्यार्थी सौमित्र विश्वास हा कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.
सौमित्र विश्वास याचा मृत्यूबाबत पोलिसांनी तत्काळ त्याने स्वतःच जीवन संपवले असल्याचे जाहीर केले, मात्र पीडिताच्या कुटुंबियांना यामध्ये काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय होता. ते कोलकता हायकोर्टात पोहचले. हायकोर्टाने साआयडी चौकशीचे आदेश देखील दिले. सोबतच एका सोबतचा विद्यार्थी औरोमिता दास याला अटक देखील करण्यात आली. पण हे प्रकरण अद्यापही उलगडलेलं नाही आणि सौमित्रचा मृत्यू अजूनही रहस्यच आहे.

सौमित्रच्या आईने काहीतरी बेकायदेशीर सुरू असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यांनी आरोप केला होता की त्यांच्या मुलाची हत्या त्या परिसरात काहीतरी अवैध सुरू असल्याबद्दल माहिती झाल्यानंतर करण्यात आली. तपासादरम्यान कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एक पॉर्नोग्राफी गँग चालवली जात असल्याचे आरोप झाले होते. ज्यामध्ये सेक्स वर्कर्स आणि मृतदेहांची विटंबना केल्याचे आरोपांचा देखील समावेश होता.

पौलामी प्रकरण

आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये आणखी एका प्रकरणात २५ वर्षीय दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या ट्रेनि पौलमी साहाचे नाव देखील समोर येते. पौलामीचा रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणात देखील पौलामीने आपला जीव दिल्याचे सांगितले गेले, मात्र तिने कुठलीही चिठ्ठी मागे ठेवली नव्हती, तिच्या मृत्यूमागचं कारण देखील आजपर्यंत अस्पष्ट आहे.
पण सैमित्र ज्या हॉस्टेलमध्ये राहात होता तेथे राहाणारा एक विद्यार्थी जो आज डॉक्टर बनला आहे, त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आमच्या सर्वांप्रमाणेच सौमित्रला देखील या सगळ्याबद्दल माहिती होती, मात्र याला विरोध करण्याची हिंमत तो किंवा आम्हा कोणामध्येच नव्हती. पण सौमित्रची जवळची मैत्रिण आणि बॅचमेटला या गँगने त्रास दिला त्यानंतर तो स्वतःला रोखू शकला नाही.

या डॉक्टरने सांगितलं की , हॉस्टेलमध्ये पॉर्न शूटिंग हे वीकेंड्सला केले जात असे. ज्यामध्ये हॉस्टेलमध्ये सेक्स वर्कर्सना बोलवले जात असे. जेव्हा कधी वेश्या उपलब्ध होत नसे तेव्हा रुग्णालयातील मृतदेह, ज्यांचा मेडिकल अभ्यासासाठी वापर केला जातो त्यांचा वापर हे लोक करत. हे खूप मोठं रॅकेट होतं, ज्याला राजकीय नेत्यांचं संरक्षण होतं. नतंर ते मृतदेहांच्या नग्न फोटोंवर मॉडलचा चेहरा लावत असत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.