भाईजानचा वेगळाच स्वॅग! किरणा दुकानातून सलमानला घरबसल्या मिळतात 1 कोटी
मुंबई : अनेक बॉलिवूड कलाकारांची मुंबईमध्ये आलिशान घरं आणि प्रॉपर्टी आहे. बॉलिवूडचा 'भाईजान' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सलमान खानचाही अशा कलाकारांमध्ये समावेश होतो. त्याच्या नावे मुंबईतल्या उच्चभ्रू सोसायटीजमध्ये आलिशान घरं आहेत.
शिवाय त्याने आपली काही प्रॉपर्टी भाडेतत्त्वावर देखील दिली आहे. त्याने भाड्याने दिलेल्या एका प्रॉपर्टीवर 'फूड स्क्वेअर' नावाचा फूड मॉल आहे. या फूड मॉलचं वैशिष्ट्य म्हणजे, या ठिकाणी सर्व सेलेब्रिटी शॉपिंगसाठी येतात.
'ई-टाइम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सलमान खानची ही प्रॉपर्टी मुंबईतल्या लिंकिंग रोडवर आहे. सलमानने 2012मध्ये पश्चिम मुंबईतल्या सांताक्रूझमध्ये ही प्रॉपर्टी खरेदी केली होती. त्यासाठी त्याने 120 कोटी रुपये दिले होते. त्यानंतर 2017मध्ये त्याने ही जागा फूड मॉलला भाडेतत्त्वावर दिली. या जागेचं मासिक भाडं 1 कोटी रुपये आहे; पण हा भाडेकरार किती कालावधीसाठी झाला आहे, याची माहिती समोर आलेली नाही.
सलमानच्या मालकीच्या जागेवर असलेल्या या 'फूड स्क्वेयर'मध्ये मुंबईतले गर्भश्रीमंत नागरिक, विशेषत: बॉलिवूड सेलेब्रिटी खरेदीसाठी येतात. या तीन मजली दुकानात नॉनव्हेज, फळं, भाज्या, सर्व खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक आणि परदेशी उत्पादनं मिळतात. प्रसिद्ध फूड ब्लॉगर निखिल चावला यांनी या दुकानाला भेट दिली होती. त्यांनी सांगितलं, की जपान, कोरिया आणि अनेक देशांतली सर्वोच्च क्वालिटीची फळं आणि नॉनव्हेज या ठिकाणी उपलब्ध आहेत. या दुकानातल्या एक किलो स्ट्रॉबेरीची किंमत 6 हजार रुपये आहे. माउथ फ्रेशर्सच्या एका बाटलीची किंमत 5 हजार रुपये आहे.निखिल चावला यांनी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, श्रीमंतांसाठी असलेल्या या दुकानात वाइन आणि बिअरसाठी वेगळा सेक्शन आहे. श्वानप्रेमींसाठी देखील स्वतंत्र सेक्शन आहे. या ठिकाणी इम्पोर्टेड पाण्याचेही अनेक प्रकार उपलब्ध आहेत. बहुतांश सेलेब्रिटी साध्या पाण्याऐवजी इम्पोर्टेड पाणी पितात. एक लिटर पाण्याच्या बाटली खरेदी करण्यासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात. बहुतांशी सेलेब्रिटी या ठिकाणी खरेदीसाठी येतात. त्यांच्या हायक्लास लाइफस्टाइलसाठी गरजेच्या असलेल्या सर्व गोष्टी इथे उपलब्ध आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.