10 वर्षे लहान तरुणासोबत विवाहिता गेली ओयो हॉटेलमध्ये; संबंध ठेवणं बेतलं जीवावर
प्रयागराज : ओयो हॉटेल जिथं कितीतरी कपल जातात. असंच एक कपल इथं गेलं होतं. एक तरुण एका महिलसोबत इथं गेला. त्याने घाईघाईत हॉटेलमधील रूम बुक केली. पण त्यानंतर तिथं असं काही घडलं की पाहून पोलिसांनाही धक्का बसला.
तरुणाने हॉटेल रूममध्ये घडलेला प्रकार स्वतःच पोलिसांना सांगितला आहे. उत्तर प्रदेशमध्ये घडलेली ही घटना. सराय गोपाल भद्री गावातील 35 वर्षांची सुमन देवी, जिचा 10 वर्षांपूर्वी बलकरनपूर गावात लग्न झालं. लग्नानंचक पतीसोबत तिचे वाद होत होते म्हणून ती माहेरीच राहत होती. रविवारी ती विवेक कुमार नावाच्या तरुणासोबत शिवगड उसराही येथील ओयो हॉटेलमध्ये पोहोचली. दोघांनी आपण पती-पत्नी असल्याचं सांगत रूम बुक केली. पण त्यानंतर तरुणानं पोलीस ठाणं गाठलं.
तरुणांना पोलिसांना सांगितलं ते धक्कादायक
विवेकनं सांगितलं की त्याने आपली प्रेयसी सुमनदेवीची हत्या केली आहे. तिचा मृतदेह ओयो हॉटेलमध्येच पडून आहे. तरुणानं जे सांगितलं ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
पोलीस ठाण्याचे प्रभारी सोरांव यांनी तात्काळ आरोपी युवक विवेक कुमारला ताब्यात घेतलं. आरोपी तरुणासह पोलीस ओयो हॉटेलमध्ये पोहोचले. एएसपीही तातडीने घटनास्थळी पोहोचले.
हॉटेलमध्ये बेडवर पडलेल्या महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. फील्ड युनिट आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीमही घटनास्थळी पोहोचली. फॉरेन्सिक टीमने कायदेशीर कारवाई पूर्ण करून पुरावे गोळा केले.
विवेकनं का केली सुमनदेवीची हत्या?
एसीपी सोरावन जंग बहादूर यादव यांनी ओयो हॉटेलचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली आहे. आरोपी तरुण महिलेसह येथे कधी पोहोचला आणि कोणत्या आयडी आणि पत्त्यावर त्याने खोली बुक केली होती, याची माहिती गोळा केली.ताब्यात घेतलेल्या युवक विवेक कुमारची पोलिसांनी चौकशी केली. प्रेमप्रकरणातून महिलेची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीनं सांगितले की, लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं. आरोपीने पोलिसांना सांगितलं की, महिला त्याच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी करत होती. ती दिली नाही तर एफआयआर दाखल करण्याची धमकी देत होती.आरोपी महिलेपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून संबंध होते. पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली. एसीपी सोरावन जंग बहादूर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस मृताच्या कुटुंबीयांच्या वतीने गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.