Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! पुण्यात 8 दिवसांपूर्वी मुलाची आत्महत्या, आई-वडिलांनीही संपवले जीवन; अख्ख कुटुंब संपलं

धक्कादायक! पुण्यात 8 दिवसांपूर्वी मुलाची आत्महत्या, आई-वडिलांनीही संपवले जीवन; अख्ख कुटुंब संपलं
 

अहमदनगर : जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून मुलाच्या निधनानंतर 10 दिवसांतच आई-वडिलांनी आत्महत्या केल्याचा ह्रदयद्रावक प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात नजीक असलेल्या वाडेकर गल्लीत पती-पत्नीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

या घटनेने परिसरात मोठी शोककळा पसरली असून 8 दिवसांपूर्वीच पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या मुलाने देखील जीवन संपवलं होतं. 2 वर्षापूर्वी त्यांच्या 16 वर्षीय मुलानेही आत्महत्या केली होती, त्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांनी अशाप्रकारे जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

पुण्यात शिक्षण घेत असलेल्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर मुलाच्या दहाव होण्यापूर्वीच वडिल गणेश मच्छिंद्र वाडेकर आणि आई गौरी गणेश वाडेकर यांनी आपली जिवनयात्रा संपवलीय. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून वाडेकर कुटुबीयांबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कौटुंबिक नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज संगमनेर शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कॉटेज हॉस्पिटल येथे पाठवले आहेत. 

दरम्यान, या पती-पत्नीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना दोन चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत. वाडेकर मुलाचा पुणे येथे जो मृत्यू झाला होता, त्यात पुणे जिल्ह्यातील वाकड पोलिसांविषयी नाराजीचा काही मजकूर असल्याची चर्चा परिसरात होती. गणेश वाडेकर हे संगमनेर नगरपालिकेतून सध्या सेवानिवृत्त झाले होते. तर त्यांची पत्नी गौरी वाडेकर या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी मृत दाम्पत्याच्या अवघ्या सोळावर्षीय मुलाने देखील घरातच आत्महत्या केली होती. तर, 8 दिवसांपूर्वी 21 वर्षीय मोठ्या मुलाने पुण्यात गळफास घेत आत्महत्या जीवन संपवले. त्यानंतर या दोघांच्या जन्मदात्यांनीही आत्महत्या केली आहे, त्यामुळे अख्ख्या कुटुंबानेच आत्महत्या करुन जीवन संपवल्याची धक्कादायक आणि मन सुन्न करणारा प्रकार संगमनेरमध्ये घडला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.