Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चक्क पोलिसाच्या बायकोनं भिशीच्या नावाखाली लुटलं, गुंतवणूकदारांना 82 लाखांचा गंडा

चक्क पोलिसाच्या बायकोनं भिशीच्या नावाखाली लुटलं, गुंतवणूकदारांना 82 लाखांचा गंडा
 

नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. चक्क पोलीस पत्नीनं अनेकांना लाखोचा गंडा घातला आहे. पैसे वाढवून देण्याचं आमिष दाखवून या महिलेनं अनेकांकडून पैसे उकळले आहेत.

82 लाखांचा गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नवी मुंबईतील एका पोलीसाच्या पत्नीने, शेजारी राहणाऱ्या इतर पोलिसांच्या पत्नी आणि नागरिकांना भिशी आणि बचत गटात पैशांची गुंतवणूक करून जास्तीचे पैसे मिळून देण्याचे आमिष दाखवले. तीने प्रत्येकाकडून पैसे वसूल केले. या महिलेनं एकूण 82 लाख रुपयांची वसुली केल्याचं समोर आलं आहे.

बेलापूर या ठिकाणी पोलीस लाईनमध्ये रहाणाऱ्या एक पोलिसाच्या पत्नीनं ही वसुली केली आहे. तीने शेजारी राहणाऱ्या इतर पोलिसांच्या पत्नी आणि नागरिकांना भिशी आणि बचत गटात पैशांची गुंतवणूक करून जास्तीचे पैसे मिळून देण्याचे आमिष दाखवले. मात्र जेव्हा पैसे परत करण्याची वेळ आली तेव्हा वेगवेगळे कारणं सागून टाळाटाळ करत असल्याचं समोर आलं आहे. यातील काही गुंतवणूकदारांना तर तीने धमक्या आणि शिवीगाळ केल्याचं देखील माहिती समोर आली आहे. 2019 ते 2022 या कालावधीमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. दरम्यान पैसे परत मिळत नसल्यानं आता गुंतवणूकदारांनी या महिलेविरोधात सिबिडी बेलापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. प्रकरणाची माहिती घेतली असून, आता तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत आरोप असलेल्या महिलेची कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. मिळाल्यास प्रतिक्रियेसह बातमी प्रसिद्ध केली जाईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.