Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पीएनजी ज्वेलर्सतर्फे नवरात्रीच्या 9 दिवसांत नवीन 9 दालनांचे उद्घाटन होणार

पीएनजी ज्वेलर्सतर्फे नवरात्रीच्या 9 दिवसांत नवीन 9 दालनांचे उद्घाटन होणार
 

पीएनजी ज्वेलर्सतर्फे नवरात्रीच्या 9 दिवसांत नवीन 9 दालनांचे उद्घाटन होणार परंपरा,संस्कृती आणि विस्ताराच्या महत्त्वपूर्ण प्रवासात शुध्दता, वचनबध्दता, महाराष्ट्रीयन परंपरा जपणारा आणि 192 वर्षांचा समृध्द वारसा आणि उत्कृष्टतेची बांधिलकी असलेल्या पीएनजी ज्वेलर्सतर्फे नवरात्रीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात नवीन 9 दालने सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येक समारंभासाठी सोने, नैसर्गिक हिरे,प्लॅटिनम व चांदीच्या बनावटींमधील अंगठ्या,कानातले, ब्रेसलेटसह 2500 ते 6500 चौरस फूट आकाराच्या प्रत्येक दालनात आभूषणांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करण्यात येणार आहे.

3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2024 या कालावधीत महाराष्ट्रभरात दररोज विविध ठिकाणी या नवीन दालनांचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. समृध्दी आणि भक्तीमय अशा नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सव कालावधीत मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरे व नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये दालनांचे उद्घाटन करून शुभारंभ केला जाणार आहे. हा विस्तार पीएनजी ज्वेलर्सच्या पारंपरिक आणि समकालीन दागिन्यांचा अनोखा मिलाफ असून, हा राज्यभरातील व्यापक ग्राहक वर्गासाठी अधिक सुलभ बनवण्याच्या वचनबध्दतेला प्रतिबिंबित करतो.

 

आपल्या ग्राहकांनी वर्षानुवर्षे दाखविलेला विश्वास या प्रती पीएनजी ज्वेलर्स या सोहळ्यांसह कृतज्ञता व्यक्त करत आहे. नवीन दालने सुरू करणे हे ब्रँडच्या सातत्यपूर्ण विस्ताराचे आणि सर्वोत्कृष्ट दर्जाचे अलंकार आणि ग्राहकांना अद्वितीय खरेदीचा अनुभव देण्याच्या समर्पणाचे प्रतीक आहे. सोबतच पीएनजी ज्वेलर्स आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येक स्टोर साठी "शुभारंभ ऑफर" देत आहे. ज्यात ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ३० टक्क्यांपर्यंत सूट तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

याबाबत पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.सौरभ गाडगीळ म्हणाले की, हा नवरात्रीचा काळ आमच्यासाठी खूप विशेष आहे. कारण आम्ही हा उत्सव साजरा करण्याबरोबरच 31100 चौरस फुटाच्या रिटेल स्पेससह महाराष्ट्रातील नवीन नऊ ठिकाणी विस्तार करत आहोत. आम्ही सुरू केलेले प्रत्येक दालन हे आमच्या ग्राहकांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. आमच्या दागिन्यांना राज्यभरात अधिक ग्राहकांपर्यंत पोहचविण्यास आम्ही उत्सुक आहोत. आमचे प्रत्येक दालन म्हणजे ग्राहकांनी पिढ्यान्‌-पिढ्या दर्शविलेल्या प्रेमाचे प्रतीक आहे. सर्वोत्कृष्ट संघटित व संपूर्ण कुटुंबासाठी ज्वेलरी ब्रँड म्हणून आमची ओळख दृढ करण्यासाठी आम्ही यापुढेही प्रयत्नशील राहू.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.