मामीनं केला घात? बर्थडे पार्टीत दारू पाजून दहावीच्या मुलीवर दोघांचा अत्याचार; महाराष्ट्र पुन्हा हादरला
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच राज्यात काही अशा घटना समोर आल्या आहेत जिथं ओळखीच्या व्यक्तींकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे. पुण्यात अल्पवयीन मुलीवर चौघांकडून अत्याचाराची घटना ताजी असतानाच अकोलाही अशाच एका घटनेनं हादरलं. जिथं, वाढदिवसाच्या निमित्तानंच दारू पाजत एका मुलीवर अत्याचार करण्यात आले.
अकोल्यातील जुन्या शहरात, दहावीतील मुलीला तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने मित्र, मैत्रीणीसह दूरच्या नात्यातील व्यक्तीसह चौघांनी संगनमतानं जबरदस्तीनं दारू पाजली. नशेच्या आहारी गेलेल्या दोघांनी यानंतर तिच्यावर अत्याचार करून ब्लॅकमेल केलं. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचताच त्यांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करत सदर पीडितेच्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान अद्याप तिचे 3 मित्र फरार झाल्याची माहिती आहे.
मावशीकडे शिकायला आली अन् घात झाला...
भुसावळ तालुक्यातील ही 15 वर्षीय मुलगी तिच्या चुलत मावशीकडे म्हणजेच अकोल्यात शिक्षणासाठी आली होती. दारफैल अकोला इथं इयत्ता दहावीत शिकणाऱ्या या मुलीच्या मानलेल्या मावशीच्या मुलीने किरण इंगळे ही मामी आहे, असे सांगून तिच्यासोबत ओळख करून दिली होती.
ओळख झाली आणि तेव्हापासून पीडित मुलीची तिच्या घरी ये-जा वाढली. पुढे किरण इंगळेचा पती लल्ला इंगळेनं पीडितेची ओळख बंटी सटवालेसोबत करून दिली आणि बंटीनं तिची ओळख त्याची प्रेयसी पायलसोबत करून दिली.
ओळख वाढली, या तिघांनी पीडितेला विश्वासात घेत 'गिरीश नावाच्या माणसाला तू बोल, आपण त्यांच्याकडून पैसे काढू,' असं सांगत पायलनं तिच्या फोनवरून गिरीश नामक व्यक्तीशी बोलायला लावलं. उपलब्ध माहितीनुसार 9 सप्टेंबर रोजी पीडिचेचा वाढदिवस होता. याच दिवशी ती लल्लाच्या घरी गेली असता तिथं तिला वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्यानं हरिहर पेठ इथं नेण्यात आलं. तिथं लल्ला आणि बंटी दारू प्यायले आणि त्यांनी पीडितेला फसवून तिला शीतपेय सांगत दारु पाजली आणि तिच्यावर अत्याचार केला.
विश्वासातील व्यक्तींनीच अत्यारा केल्याच्या या घटनेमुळं आता पुन्हा एकदा महिलांवरील वाढते अत्याचार आणि या नराधमी वृत्तीनं चिंता वाढवली आहे. इतकंच नव्हे, तर बायका- मुली सुरक्षित आहेत तरी कुठे? हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरितच राहिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.