पंतप्रधान नरेंद्र मोदींशी थेट करा संपर्क; जाणून घ्या फोन नंबर आणि ईमेल पत्त्यापर्यंतचे सर्व तपशील
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 74 वां वाढदिवस साजरा करत आहेत. देशातील करोडो लोक पंतप्रधानांना फॉलो करतात. देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांचे विचार पंतप्रधान मोदींसोबत शेअर करायचे आहेत.
लाखो लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला असेल. या वेगवेगळी कारणे असू शकतात. सरकारच्या कामाचे कौतुक, निर्णयांवर टिका किंवा एखादी तक्रा यांसारख्या कारणांचा त्यात समावेश असू शकतो. असे अनेक लोक आहेत ज्यांना देशासाठी काही सूचना देण्यासाठी पंतप्रधानांशी संपर्क साधायचा आहे.
तुमच्या माहितीसाठी, पंतप्रधान कार्यालय दररोज ट्विटरवर सरासरी टिप्पण्यांची यादी तयार करते आणि ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शेअर करते. अशा परिस्थितीत, थेट पंतप्रधानांशी संपर्क साधायचा असेल, तर यासाठी अनेक पद्धती अवलंबू शकता. पीएम मोदींशी तुम्ही कसे संपर्क साधू शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुकपासून ट्विटरपर्यंत प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटवर सक्रिय असतात. येथे आम्ही तुम्हाला पीएम मोदींचा फोन नंबर आणि त्यांच्या सर्व सोशल मीडिया खात्यांची माहिती देणार आहोत.
या पत्यावर पाठवा नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुम्हाला जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, किंवा काही प्रश्न किंवा सूचना सांगयच्या असतील तर तुम्ही www.pmindia.gov.in/en/interact-with-honble-pm/ वर लॉग इन करून स्वतःची नोंदणी करू शकता. तुमच्या माहितीसाठी हे एक अधिकृत पोर्टल आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आले आहे. आता तुम्ही थेट पंतप्रधानांना त्यांच्या अदिकृत पत्त्यावर पत्र लिहून शुभेच्छा देऊ शकता किंवा तुमचे विचार त्यांच्या सोबत शेअर करू शकता. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींना देशभरातून रोज 2 हजारांहून अधिक पत्रे येतात. यासाठी तुम्ही 'भारताचे माननीय पंतप्रधान, 7 रेसकोर्स रोड, नवी दिल्ली' लिहूनही पत्र पाठवू शकता.
या प्रमाणे विचारू शकता तुमचे प्रश्न
जर तुम्हाला भारताच्या हिताविषयी कोणते प्रश्न पंतप्रधानांना विचारायचे असतील तर, तुम्ही www.mygov.in वरून हे करू शकता. या बेवसाईटवर तुम्ही सूचना किंवा कल्पना सामायिक करू शकता. याशिवाय तुम्ही RTI द्वारे PMO ला कोणतेही प्रश्न विचारू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट
@PMOIndia किंवा @Narendramodi वर ट्विट करून तुम्ही तुमचे मत थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकता. पीएम मोदींचे ट्विटरवर 16 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
पंतप्रधान मोदींचे ईमेल आयडी, इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट
तुम्ही पंतप्रधानांच्या ईमेल आयडी narendramodi1234@gmail.com वर तुमची प्रश्न, विचार त्यांना पाठवू शकता. याशिवाय इंस्टाग्राम, लिंक्डइनवरही पंतप्रधानांशी संपर्क साधू शकता. Instagram साठी https://www.instagram.com/narendramodi/ आणि LinkedIn साठी https://in.linkedin.com/in/narendramodi या अकाऊंटवर तुम्ही संपर्क साधू शकता. तसेच फेसबुकवर तुम्ही नरेंद्र मोदी फेसबुक पेज किंवा fb.com/pmoindia ला भेट देऊ शकता. या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यामातून तुम्ही तुमचे मत पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकता.
तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन कॉलही करू शकता. नमो अँड्रॉइड ॲपद्वारे देखील त्यांच्याशी संपर्क साधू शकता. नमो अँड्रॉइड ॲप डाउनलोड करून तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेसेज करू शकता आणि त्यांच्याशी कनेक्ट राहू शकता. अधिकृत पत्ता आणि संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहेत-
पत्ता: वेब माहिती व्यवस्थापक, साउथ ब्लॉक, रायसीना हिल
नवी दिल्ली: ११००११
फोन नंबर: 23012312
फॅक्स: 23019545,23016857
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.