"सीएम साहेबांचा दरवाजा बंद ? " मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने चक्क आमदाराला नाकारला प्रवेश !
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी वर्धा दौरा असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह विविध मंत्री नागपुरात आहेत. रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्कामी असून काल सांयकाळी त्यांना भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर भेटण्यासाठी आले असता, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारल्याची माहिती समोर आली. त्यामुळे भोंडेकर आल्यापावली परतले.
पंतप्रधानाचा दौरा असल्याने मुख्यमंत्री काल सायंकाळी नागपुरात आले. यावेळी त्यांनी पक्षातील विविध नेत्याची भेट घेतली. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. यादरम्यान रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर रामगिरीवर आले. मात्र, त्यांना सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारला. यावेळी त्यांच्या नावाची चिठ्ठीही मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली. मात्र, त्यानंतरही त्यांना आत न बोलाविले नाही. दरम्यान याबाबत त्यांनी 'सीएम साहेबांनी दरवाजा बंद केल्याने एन्ट्री दिली नाही' अशी प्रतिक्रिया देत, आल्यापावली परतले.दरम्यान या प्रकाराची परिसरात एकच चर्चा रंगली. अपक्ष म्हणून निवडुन आल्यावर युती सरकार होताच, त्यांनी शिंदे गटाला पाठींबा दिला होता. मात्र, या प्रकाराने त्यांच्यामध्ये नाराजी असल्याची चर्चा परिसरात होती. दरम्यान काही वेळाने पुन्हा त्यांना बोलाविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.