दंगलीची चुकीची माहिती प्रसारित केल्याने पत्रकारावर गुन्हा दाखल
नंदुरबार: जनमानसात पोलीस दलाविषयी अप्रीतीची भावना निर्माण केली व दोन समाजा मध्ये तेढ व भितीचे वतावरण निर्माण होईल असा मजकुर व्हॉटसअप ग्रुपवर प्रसारीत केला या कारणावरुन नंदुरबार येथील एका पत्रकारा विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
नंदुरबार येथे तीन दिवसापूर्वी दोन गटात मोठी दंगल झाली होती. त्या दंगलीत दंगेखोरांनी पोलिसांना लक्ष बनवल्यामुळे गृह रक्षक दलातील जवान आणि पोलीस कर्मचारी व पोलिस अधिकारी यांच्यासह 23 जण जखमी झाले तर पोलिसांच्या वाहनांसह 26 वाहनांचे नुकसान झाले. जाळपोळीमुळे अनेक घरांचे व दुकानांचे नुकसान झाले. दरम्यान, या संदर्भात अक्षेपार्य माहिती प्रसारित होत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यावरून त्यांनी कारवाई सुरू केली. त्यामुळे व्हाट्सअप वर चुकीची माहिती प्रसारित करणे एका पत्रकाराला महाग पडले.
याविषयी पोलीस मुख्यालयातून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, फहीम पत्रकार (मित्र परिवार) व्हॉटसअप ग्रुप मध्ये ९६७३३३६३१३ या मोबाईल क्रमांक धारकाने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण असतांना दंगलीचा एक व्हिडीओ प्रसारित केला. त्या खाली "नंदुरबार दंगल पुलिस दंगा करने वालों को पुरा पूरा साथ देते हुऐ देखी जा सकती है" असा मजकुर व इंग्रजीत HOLY MAKER लिहिले होते. ८९५६२२३३८६ या क्रमांक वरूनही त्याच दंगलीचा व्हिडीओ त्या खाली असा मजकुर टाईप करुन प्रसारीत केला. जनमाणसात पोलीस दलाविषयी अप्रीतीची भावना निर्माण केली व दोन समाजामध्ये तेढ व भितीचे वातावरण निर्माण होईल अशा पध्दतीने चिथावणीखोर पोस्ट व्हॉटस् अप ग्रुपवर प्रसारीत केली तसेच फहीम पत्रकार (मित्र परिवार) ग्रुप ऍडमीन याने सदर व्हिडीओ क्लीप डिलीट केले नाही किंवा व्हिडीओ क्लीप टाकणारे मोबाईल क्रमांक धारक यांना ग्रुप मधुन रिमुव्ह केलेले नाही म्हणुन गुन्हा दाखल केला असे पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.