रात्री झोपताना सॉक्समध्ये कापलेला कांदा ठेवण्याचे फायदे, वाचाल तर रोज कराल हा उपाय!
लोक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अनेक घरगुती उपाय नेहमीच करत असतात. कुणी वेगवेगळ्या नॅचरल ड्रिंक्सचं सेवन करतं तर कुणी आयुर्वेदिक जडीबुटींचा वापर करतं. काही लोक रात्री झोपताना सॉक्स घालतात आणि त्यात कापलेला कांदा ठेवतात.
आता अनेकांना याचं कारण माहीत नसेल. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला जर रात्री सॉक्समध्ये कापलेला कांदा ठेवून समजले तर तुम्हीही रोज असंच कराल. वेगवेगळ्या शोधांमध्ये समोर आले आहे की, कापलेला कांदा सॉक्समध्ये ठेवून झोपल्यास कांद्यातील पोषक तत्व त्वचेत सामावतात आणि त्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
वैज्ञानिक कारण
तळपायांमधील अनेक पेशी या शरीराच्या इतर पेशींसोबत जुळलेल्या असतात. या शरीरात शक्तीशाली ऊर्जेप्रमाणे काम करतात. पण जोडे-चपलांच्या वापराने या निष्क्रिय होतात. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की, डॉक्टर अनेकदा चप्पल न घालता चालण्याचा सल्ला देतात. कांद्यामध्ये असलेल्या फॉस्फोरिक नावाच्या अॅसिडमुळे रक्त शुद्ध होतं. लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे एकदा वापरलेला कांदा पुन्हा चुकूनी वापरू नये.
रक्त होईल शुद्ध
आजकाल आपल्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे रक्तात अनेक अशुद्ध गोष्टी मिश्रित होतात. या कारणाने अनेक आजार आपल्याला होतात. कांद्यामध्ये फॉस्फोरिक अॅसिड असतं. जे तुमचं रक्त शुद्ध करतं.
बॅक्टेरिया होतील दूर
कांद्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-व्हायरल गुण असतात. दिवसभर चालल्याने आणि मातीच्या संपर्कात आल्याने किंवा घामामुळे पायांवर मोठ्या प्रमाणात कीटाणू चिकटलेले असतात. यावर अनेकजण फार लक्ष देत नाहीत. तळपाय आपल्या शरीराचा शिरोबिंदू मानले जातात. त्यामुळे कांद्याचा सर तळपायांवर लावल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात.
हवा होईल शुद्ध
जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या पायांच्या आजूबाजूला कांद्याच्या गंधाने हवा शुद्ध होते. तसेच पायांची दुर्गंधी, विषारी पदार्थ आणि केमिकलही शोषणू घेतो.
कसा वापराल कांदा?
पांढरा किंवा लाल कांद्याचे स्लाइस करा. जेणेकरून ते तुमच्या तळपायांवर नीट ठेवता येतील. कांदा पायांवर ठेवून वरून सॉक्स घाला. कांदा पायांच्या त्वचेला चिकटून रहायला हवा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.