पुण्यातील उद्योजकाच्या हत्येचे गोवा कनेक्शन, पत्नीनं काढला काटा? प्राथमिक तपासात कारण समोर
कारवार : हणकोण- कारवार येथील विनायक नाईक (वय ५२) हत्या प्रकरणात मंगळवारी धक्कादायक माहिती उघडकीस आली. विनायक नाईक यांची पत्नी वैशालीचे गोव्यातील गुरुप्रसाद राणे याच्यासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते आणि यातूनच विनायक यांची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे.
गुरुप्रसाद राणे सध्या फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची पोलिसांनी दिली. विनायक उर्फ राजू काशिनाथ नाईक यांची रविवारी पहाटे ५.३० च्या सुमारास सुरा, तलवार लोखंडी रॉडने प्रहार करून हत्या करण्यात आली होती. यात त्यांची पत्नी वैशाली गंभीर जखमी झाली. तिच्यावर कारवार जिल्हा इस्पितळात उपचार होत असून प्रकृती सुधारत असल्याची माहिती कारवार जिल्हा पोलीस प्रमुख एम.नारायण यांनी दिली. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे,असेही त्यांनी सांगितले होते.
कोण आहेत विनायक नाईक?
विनायक नाईक यांचा पुण्यातील वाकड येथे इलेक्ट्रीकल वस्तूंचा व्यवसाय असून ते मूळचे हणकोण- कारवार येथील आहेत. हणकोण येथील श्री सातेरी देवीच्या जत्रोत्सवात सहभागी होण्यासाठी ते कुटुंबीयांसमवेत मूळ गावी आले होते. १० ते १६ सप्टेंबर या कालावधीत ही जत्रा होती.मात्र, जत्रोत्सव संपल्यानंतर २१ सप्टेंबर रोजी आईच्या श्राद्धासाठी त्यांनी मुक्काम वाढविला होता. रविवारी म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी सकाळी ते परत पुण्याला जाणार होते, त्यासाठी पहाटे आवरा आवर करताना पाच अनोळखींनी त्यांच्या घरात घुसून तलवारीने त्यांच्यावर वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात काय उघड झाले?
नाईक यांच्या खुनाचे धागेदोरे गोव्यापर्यंत पोहोचले आहेत. पत्नी वैशालीने तिचा गोव्यातील प्रियकर गुरुप्रसाद राणे (राहणार- फोंडा, गोवा) याच्या मदतीने हत्या घडविल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस बेपत्ता संशयीत गुरुप्रसाद राणेंच्या शोधात असल्याचे माहिती सूत्रांनी गोमन्तक टीव्हीला दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.