"आणि त्याला दरवाजावर बघून मी जवळपास बेशुद्ध पडलो" ; अमिताभ बच्चन यांनी सांगितली मायकल जॅक्सनबरोबरची ती आठवण
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कायमच चर्चेत असतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट कायमच गाजतात. तर त्यांचा कौन बनेगा करोडपती हा शो ही सध्या गाजतोय. नुकतंच त्यांनी या एपिसोडमध्ये खास आठवण शेअर केली. कौन बनेगा करोडपती या सोनी टेलिव्हिजनवरील शोमध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी हजेरी लावली होती. राणी आणि अभय यांना अमिताभ यांनी त्यांचा आवडता गायक कोण असा प्रश्न विचारला. त्यावर त्या दोघांनी त्यांना मायकल जॅक्सनची गाणी खूप आवडतात असं उत्तर दिल. पुढे राणी बंग यांनी अमिताभ यांना त्यांची आणि मायकल जॅक्सन यांच्या भेटीची आठवण सांगण्याची विनंती केली.
अमिताभ म्हणाले कि,"मी न्यूयॉर्क मधील एका हॉटेलमध्ये राहत होतो. एके दिवशी माझ्या रूमचं दार कुणीतरी ठोठावलं. मी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा समोर मायकल जॅक्सन होता आणि मला जोरदार धक्का बसला. मी जवळजवळ बेशुद्ध पडणार होतो पण मी स्वतःला सावरलं. मी त्याचं स्वागत केलं आणि त्याने मला विचारलं कि, ही माझी खोली आहे का ? जेव्हा मी होकार दिला तेव्हा त्याच्या लक्षात आलं कि त्याने चुकीच्या खोलीचा दरवाजा वाजवला आहे. नंतर जेव्हा तो त्याच्या खोलीत गेला त्याने कुणाकडे तरी माझ्याबद्दल चौकशी केली. नंतर आम्हाला एकत्र बसण्याची आणि बोलण्याची संधी मिळाली. इतका प्रसिद्ध असूनही तो खूप नम्र होता. अशा प्रकारे आम्ही पहिल्यांदा भेटलो." सोशल मीडियावर अमिताभ यांनी सांगितलेला हा किस्सा व्हायरल झाला आहे. अमिताभ यांचा कल्की 2898 एडी हा सिनेमा खूप गाजला. त्यांच्याबरोबर प्रभास आणि दीपिका पदुकोणचीही मुख्य भूमिका होती. लवकरच या सिनेमाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.