Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सीबीआयची मुंबईत मोठी कारवाई! सेंट्रल जीएसटी अधीक्षकासह दोघांना अटक, प्रकरण काय?

सीबीआयची मुंबईत मोठी कारवाई! सेंट्रल जीएसटी अधीक्षकासह दोघांना अटक, प्रकरण काय?
 

केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने मुंबईमध्ये  सीजीएसटीच्या लाचखोर अधीक्षकासह आणखी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ६० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयच्या या मोठ्या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय अन्वेषण विभागाच्या टीमने मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सीबीआयने सीजीएसटी (अँटी इव्हेशन) अधीक्षकासह 3 आरोपींना आणि दोन खाजगी व्यक्तींना 60 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. ६० लाखांपैकी २० लाखांची लाच घेतानाच रंगेहात पकडण्यात आले असून याप्रकरणात तब्बल सात अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीजीएसटीकडे असलेल्या एका प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून या अधिकाऱ्यांनी तब्बल ६० लाखांची मागणी केल्याचे तपासात समोर आले आहे. यामधील ३० लाख रुपये हवालामार्फत देण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या कारवाईमध्ये सीजीएसटीचे अतिरिक्त सह आयुक्त, सीजीएसटी आयुक्त, 4 अधीक्षक, 2 सनदी लेखापालासह एका खासगी व्यक्तींचा सहभाग आहे. दरम्यान, या सर्वांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.