नालासोपाऱ्यात ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, तीन जणांना अटक
राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा घटनेत लक्षणीय वाढ झाली. बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा परिसरात एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
न्यायालयाने तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
नरेंद्र मोरया (वय, ३१), प्रकाश सिंह (वय, २६) आणि पंचराज सिंह (वय, ३५) अशी आरोपींची नावे आहेत. महिलेच्या तक्रारीवरून आचोळे पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ६४, ७० (१) आणि ३५१(२) अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती आचोळे पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.