Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ही खरी दबंगगिरी! साहेब, खासदाराची गाडीये! मग काय झाले, आधी दंड

ही खरी दबंगगिरी! साहेब, खासदाराची गाडीये! मग काय झाले, आधी दंड 
 

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरू असताना फॅन्सी नंबर प्लेट लावलेली खासदारांची अलिशान गाडी पोलिसांनी थांबवली. गाडीतील व्यक्ती मात्र क्षणात खासदाराची गाडी असल्याचे सांगून निवांत झाले. पोलिस उपायुक्त नितिन बगाटे यांनी मात्र गाडी खाली उतरून सदर वाहन चालकाला दिड हजार रुपयांचा दंड भरायला भाग पाडले. हे पाहून अन्य वाहनचालकांनी वाद घालणे सोडून दंड भरण्यासाठी खिशात हात घातला.

पोलिस उपायुक्त नितिन बगाटे यांनी रविवारी दुपारी ४.३० वाजता क्रांतीचौकात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईस प्रारंभ केला. काळ्या रंगाची अशोकस्तंभाचे स्टिकर लावलेली कार (एम एच २८ बी डब्ल्यु ८८) सुसाट जाताना त्यांना फॅन्सी नंबर प्लेट निदर्शनास पडली. त्यांनी गाडी अड्वून वाहतूक कर्मचाऱ्यांना दंड ठोठावण्याचे आदेश दिले. मात्र, चालक व शेजारील व्यक्तीने गाडीतूनच 'साहेबांची गाडी' असल्याचे सांगून निघण्याचा प्रयत्न केला.

दंड न भरण्यासाठी गाडीतील व्यक्तींनी जवळपास १५ मिनिटे कॉल लावून पोलिस अधिकाऱ्यांकडे मोबाईल देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बगाटे यांनी जुमानले नाही. पहिले दंड भर, मग जा, असे स्पष्ट खडसावल्यानंतर दिड हजार रुपये रोख भरुन गाडी पुढे रवाना झाली. यावेळी १२ बुलेटस्वारांवर देखील कारवाई करण्यात आली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.