Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची केली हत्या, मृतदेह रिक्षामध्ये ठेवून प्रियकर फरार.

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची केली हत्या, मृतदेह रिक्षामध्ये ठेवून प्रियकर फरार.
 

पुणे - ऐन गणेशोत्सवात पिंपरी- चिंचवडमध्ये तीन दिवसांत दुसरी हत्या झाली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड येथून समोर आली आहे. त्यानंतर प्रेयसीचा मृतदेह तिच्या आईच्या घरासमोर असलेल्या रिक्षामध्ये ठेवून प्रियकर फरार झाला. ही घटना काल रात्री बारा ते पहाटे तीन या दरम्यान घडली असून, सकाळी ती उघडकीस आली आहे. शिवानी सुपेकर असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विवाहानंतर शिवानीचे पती सोबत खटके उडाले होते, त्यानंतर रिक्षाचालक विनायक आवळे सोबत तिचे प्रेम संबंध जुळले. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


शिवानी सोमनाथ सुपेकर असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. काल, बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. गेली दोन वर्षे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मंगळवारी रात्री या दोघांमध्ये किरकोळ वाद झाले. याच रागातून विनायकने शिवानीचा गळा आळवून हत्या केली. मग, मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली आणि तो पसार झाला. काहींना आज सकाळी रिक्षात शिवानी बसल्याचं दिसलं, पुढं ती मृत पावल्याचं लक्षात आलं. वाकड पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे. ही हत्या प्रियकर विनायकने केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचलेली आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दोन दिवसांपूर्वी वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतच अली अन्सारीची दगडाने ठेचून हत्या झाली होती. आता या महिलेचा गळा घोटण्यात आला. त्यामुळं ऐन गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ही घटना घडल्याने पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. खून, दरोडा, बलात्कार यासारखे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने अशा प्रकारची गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे. या घटनेचा अधिक तपास वाकड पोलिसांकडून केला जात आहे.


 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.