तालुकास्तरीय फुटबॉल सामन्यात अल्फोंसा स्कूल अजिंक्य
मिरज: जिल्हा क्रीडा संकुल मिरज या ठिकाणी तालुकास्तरीय शालेय फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात मिरज येथील अल्फोंसा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १७ वर्षाखालील गटामध्ये अजिंक्यपद पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या वेळी पहिला सामना अल्फोंसा स्कूल व बेथेस्दा स्कूल यांच्यात झाला. यामध्ये अल्फोंसा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ३-० असे गोल करत दमदार सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात सेंट्रल स्कूल सांगलीच्या विद्यार्थ्यांना नमवत सामना २-० गोलने जिंकला.
तिसऱ्या सामन्यात केंब्रिज स्कूलला ३-० गोलने हरवले तर अंतिम सामन्यात केंब्रिज स्कूल सी.बी.एस.ई. ला ४-० गोलने हरवत अजिंक्य पद पटकावले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक राजीव मिरयाला यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक फादर सीजू जॉर्ज व उपमुख्याध्यापक फादर लिओ मायकल जेम्स यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.