कोल्हापूर :-सासरच्या छळाला कंटाळून प्राध्यापिकेने संपविली जीवनयात्रा
कोडोली/वारणानगर : माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी सतत होणार्या छळास कंटाळून बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील प्रा. सौ. प्रियांका रणजित पाटील (वय 31) हिने राहत्या घरात फॅनला साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
याप्रकरणी पती रणजित सुभाष पाटील, सासू सौ. शोभा सुभाष पाटील, सासरे सुभाष हिंदुराव पाटील, दीर इंद्रजित सुभाष पाटील, जाऊ सौ. प्रज्ञा इंद्रजित पाटील आणि नणंद सौ. शीतल चव्हाण (रा. कोळे, ता. कराड, जि. सातारा) या सहा जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा पती, सासू, दीर व जाऊ यांना अटक करण्यात आली. प्रियांकाचे वडील सुनील वसंतराव पवार (रा, कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली.
कुंडल येथील प्रियांकाचा विवाह रणजित पाटील याच्याशी 2017 मध्ये झाला होता. प्रियांकाला माहेरहून खासगी साखर कारखाना खरेदीसाठी दहा लाख रुपये आणण्याची मागणी सुरू केल्यावर तिने पाच लाख रुपये आणले होते. परंतु, अजून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिला शिवीगाळ, मारहाण करत छळ सुरू होता. याला कंटाळून तिने जीवनयात्रा संपविली. केली. अधिक तपास शाहूवाडीचे पोलिस उपाधिक्षक आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कैलास कोडग करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.