आजच्या काळामध्ये लोकांच्या सवयी फार बदलल्या आहेत. या काळामध्ये आणि पूर्वीच्या काळामध्ये फार फरक आहे. जसे जसे लोकांची राहण्याची पध्द्त त्याचबरोबर लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल घडत आहे. तसे तसे लोकांमध्ये आजारांचे प्रमाणही वाढत आहे. आजकाल बहुतेक गोष्टी फार सोप्या झाल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवी मेंदूचा भर कमी झाला आहे. अशा मुळे, मानवाने प्रत्येक गोष्टीमध्ये तंत्रज्ञानाची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. चालण्यापासून ते कामामध्ये डोकं लावण्यापार्यंत, मानव कोणत्याना कोणत्या तंत्र ज्ञानावर अवलंबून आहे. मानवी मेंदूचा विकास झाला म्हणून तर तंत्रज्ञानाचा विकास झाला आहे, परंतु तंत्रज्ञानाचा अतिवापराने मानवाच्या बाकीच्या अवयवांवर पारिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. जास्त हालचाल न केल्यामुळे आरोग्यावर फार मोठे परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे.
शरीरमध्ये अनेक प्रकारच्या त्रासाला सुरुवात झाली आहे. आरोग्य विस्खलित होत चालले आहे. यातील सगळ्यात महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे शरीरातील युरिक ऍसिडचे मोठ्या प्रमाणामध्ये वाढणे. शरीरातील युरिक ऍसिडच्या वाढण्याच्या या त्रासला आजकाल बहुतेक जण त्रासले आहेत. शरीरातील युरिक ऍसिडच्या वाढीमुळे सांधेदुखी, सुजन तसेच अकडनसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे वेळेनुसार याला थांबवणे फार महत्वाचे असते, अन्यथा हा त्रास वाढत जातो. वेळीच युरिक ऍसिड वाढीच्या त्रासला थांबवले नाही तर पुढे जाऊन हा मोठ्या विकारामध्ये रूपांतर घेऊ शकतो. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत, जे आपण आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये आहारात सेवन करतो. त्या गोष्टी प्रथमतः टाळल्या पाहिजेत.
वांग्याला प्युरीनाचे स्तोत्र मानले जाते. युरिक ऍसिडचा त्रास असल्यास वांग्याचे सेवन टाळावे. जर असा परिस्थितीमध्ये देखील वांगे खाल्ले तर शरीरात सूज येणे, चेहऱ्यावर पुरळ येणे तसेच खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. वांग्याबरोबर वाळलेले वटाणे खाल्ल्याने देखील युरिक ऍसिडचा त्रास वाढतो. वाळलेल्या वटण्यामध्ये प्युरीनचे प्रमाण फार असते. त्यामुळे त्याचे सेवन करणे शक्यतो टाळावे.
तसेच जर तुम्हाला यूरिक ॲसिडची समस्या असेल तर पालक, मशरूम आणि कोबीसारख्या भाज्या खाणे टाळा कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते, जे यूरिक ॲसिडच्या रुग्णांसाठी हानिकारक असते. आर्बी हे आरोग्यासाठी चांगले मानले जात असले तरी सांधेदुखीच्या रुग्णांनी त्याचे सेवन करू नये. याच्या सेवनाने सांधे दुखू शकतात तसेच युरिक ऍसिडची पातळी वाढू शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.