महिला घरातही असुरक्षित! सासरा, दीर आणि मामेभावाकडून विवाहितेवर सामूहिक बलात्कार
बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना टिटवाळा परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पीडिताचा सासरा, दीर आणि मामे भावाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडिताचा मामे भाऊ अल्पवयीन असल्याचे समोर आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा परिसरात राहणाऱ्या एका महिलेवर घरात सासरा आणि दिरासह एका अल्पवयीन मामेभावाने सामूहिक बलात्कार केला. घरात कुणी नसताना हा सगळा प्रकार घडला.महिलेने ही बाब कामावरून आलेल्या आपल्या पतीला सांगितली. परंतु, पीडिताच्या पतीने तिचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी तिलाच मारहाण केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. यानंतर पीडित महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर दोन दिवस उपचार करण्यात आले. अखेर महिलेने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
टिटवाळा कल्याण ग्रामीण पोलिसांनी पीडित महिलेचा सासरा, दीर आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सुनील वाघे (वय-२२, दीर) आणि काशिनाथ वाघे (वय- ५०, सासरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.