Jio ची दिवाली धमाका ऑफर! एक वर्ष फ्री इंटरनेट; पाहा आणखी काय
मुंबई : गणेशोत्सवाची धामधूम संपली असून, आता दसरादिवाळीचे वेध अनेकांना लागले आहेत. दसरा, दिवाळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत असल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांकडून विविध ऑफर देण्याची एकप्रकारे स्पर्धाच सुरू झाली आहे. यामध्ये रिलायन्स कंपनी देखील मागे नाही. रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी
दिवाळीनिमित्त एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला एक वर्षासाठी
मोफत 5G इंटरनेटचा आनंद घेता येईल.
जिओने त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना पुन्हा एकदा मोठी भेट दिली आहे. कंपनीने आता दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहक मोफत जिओ एअर फायबर सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. या ऑफरमुळे ग्राहकांचा दिवाळी खरेदीचा अनुभव आणखी चांगला होईल. तसंच कंपनीचं डिजिटल कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्याचं उद्दिष्ट आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना मोफत जिओ एअर फायबर सबस्क्रिप्शन मिळवण्याची सुवर्णसंधी आहे, असा दावाही कंपनीनं केलाय. चला तर, एक वर्षासाठी मोफत 5G इंटरनेटचा आनंद देणारी ही ऑफर नेमकी काय आहे, त्याबाबत जाणून घेऊ.
नवीन व सध्याच्या ग्राहकांना मिळेल लाभ
जिओच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी नवीन ग्राहकांना रिलायन्स डिजिटल किंवा माय जिओ स्टोअरमधून 20 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तूंची खरेदी करावी लागेल. अथवा नवीन जिओ एअर फायबर कनेक्शनसाठी 2,222 रुपयांचा तीन महिन्यांचा ॲडव्हान्स प्लॅन घ्यावा लागेल. तर सध्याचे जिओ ग्राहक दिवाळी प्लॅनसह एक ॲडव्हान्स रिचार्ज करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. जिओची ही ऑफर ग्राहकांसाठी खूपच फायदेशीर आहे.
दिवाळीपर्यंत घेता येईल ऑफरचा लाभ
जिओच्या या ऑफर अंतर्गत पात्र ग्राहकांना 12 महिन्यांसाठी जिओ एअर फायबरचं सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. 18 सप्टेंबर 2024 ते 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येईल. या ऑफरचं कुपन 30 दिवसांच्या आत रिडीम करावं लागेल. हे कुपन रिलायन्स डिजिटल, माय जिओ स्टोअर्स, जिओ पॉईंट स्टोअर्स किंवा जिओ मार्ट डिजिटल एक्सक्लुझिव्ह स्टोअर्सवर 15 हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी केल्यानंतर ग्राहकांना दिलं जाईल. त्यानंतर ते रिडीम करता येईल.
जिओची ही ऑफर ग्राहकांसाठी खूपच फायदेशीर आहे. आता त्याला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळेल, हे लवकरच स्पष्ट होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.