Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अर्ध्या रात्री महिलेने Swiggy वर दिली अशी ऑर्डर, डिलिव्हरी बॉयला फुटला घाम...

अर्ध्या रात्री महिलेने Swiggy वर दिली अशी ऑर्डर, डिलिव्हरी बॉयला फुटला घाम...
 

मोबाइलच्या एका क्लिकवर सर्व वस्तू आता सहज घरपोच मिळू लागल्या आहेत. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाइन मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्वांमध्ये आता स्वीगी  या ऑनलाईन फूड देणाऱ्या कंपनीनेही ग्रोसरीपासून कपड्यांपर्यंतच्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची सेवा सुरु केली आहे.

यासाठी स्वीगी इन्स्टामार्ट सुरु करण्यात आलं आहे. एका महिलेने स्विगीवरुन अर्ध्या रात्री अशीच एक वस्तू मागवली ज्याची चर्चा सोशल मीडिआवर सुरु आहे. ही वस्तू डिलिव्हरी करणाऱ्या मुलालाही महिलेच्या घरी जाण्यासाठी भीती वाटू लागली. ही वस्तू अर्ध्या रात्री का मागवली असेल हा विचार करुन डिलिव्हरी बॉयला  अक्षरश: घाम फुटला. सोशल मीडियावर हा घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे.

महिलेने स्विगीवरुन काय मागवलं?
ही घटना कर्नाटक राज्यातील बंगळुरुमधली आहे. कर्नाटकात 6 ते 15 सप्टेंबरदरम्यान ओनम सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादरम्यान बंगळुरुमध्ये राहणाऱ्या एका महिलेने अर्ध्या रात्री स्वीगीवरुन एक वस्तू मागवली. ही सर्व घटना महिलेनेच सोशल मीडियावर शेअर केली असून तिची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. महिलेची ही पोस्ट आतापर्यंत 1 लाख 70 हजार यूजरने पाहिली आहे.

वास्तविक या महिलेने स्वीगीवरुन साडी ऑर्डर केली होती. अर्ध्या रात्री महिलेने साडी मागवल्याने डिलिव्हरी बॉय घाबरला. ही हिला भूताटकी करत असेल आणि यासाठीच तिने इतक्या रात्री साडी मागवली असेल असे विचार आल्याने त्याला घाम फुटला.
महिलेने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

नीरजा शाह नावाच्या या महिलेने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपला अनुभव सांगितला आहे. बंगुळुरु मोठ्या प्रमाणावर ओनम सण साजरा केला जातो. सण साजरा करण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणी प्लानिंग केली. त्यामुळे @SwiggyInstamart वरुन एक साडी ऑर्डर केली' असं महिलेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुढे तीने म्हटलंय साडीची ऑर्डर पाहून स्वीगी डिलिव्हरी बॉय देखील घाबरला होता. इतक्या रात्री कोणी साडी मागवेल याचा विचारही त्यने केला नसेल. असं या महिलेने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. या महिलेने स्वीगीचे आभारही मानले आहेत. शेवटच्या क्षणी स्वीगीने माझी मदत केली. यावर स्वीगी केअरनही प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्हाला ओनमची मिठाई खाऊ घाला' असं स्वीगीने म्हटलं आहे.

पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रिया

नीरजा शाह या महिलेच्या पोस्टवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय त्या डिलिव्हरी बॉयला 'स्त्री' चित्रपट आठवला असेल. तर एका युजरने म्हटलंय इतक्या रात्री साडी मागवल्यावर बिचारा डिलिव्हरी बॉय घाबरणार नाही तर काय करणार? दक्षिण भारतात ओनम हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जोता. आंध्र प्रदेश, तेलंगाना, तामिलनाडू आणि कर्नाटकात ओनम सणाची धूम असते. या वर्षी 6 ते 15 सप्टेंबरदरम्यान हा सण साजरा करण्यात आला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.