1682044760 कोटी रुपयांच्या हिऱ्यांची पावडर करुन पृथ्वीच्या वातावरणात सोडण्याचा मास्टर प्लॅन! कारण...
ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच पृथ्वीचं वाढणारं तापमान हा मानवजाती समोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. मानवासमोर उभ्या असलेल्या नैसर्गिक आव्हांनामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. ग्लोबल वॉर्मिंगचा परिमाण मागील काही वर्षांपासून प्राकर्षाने जाणवू लागला
आहे. दिवसोंदिवस हा परिणाम अधिक दाहक होत असून यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी
धोक्यात येईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच सध्या वैज्ञानिक पृथ्वीचं
तापमान कसं नियंत्रणात ठेवता येईल यासाठी प्रयत्न करत आहे.
नेमकी काय माहिती समोर आली आहे?
नुकत्याच
प्रकाशित झालेल्या 'जिओफिजिकल रिसर्च लेटर्स'मध्ये असं सांगण्यात आलं आहे
की, पृथ्वीच्या वातावरणामध्ये हिऱ्यांची पूड सोडल्यास ग्लोबल वॉर्मिंगमुळे
वाढलेलं तापमान कमी करण्यासाठी मदत होईल. वेगवेगळ्या संस्थांमधील हवामान
अभ्यास तज्ञ, मेट्रोलॉजिस्ट आणि अर्थ सायंटीस्टने आधुनिक थ्री डी
मॉडेल्सच्या मदतीने पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरात हिऱ्यांची पावडर
सोडण्याने काय परिणाम होतील याचा अभ्यास केल्यानंतर हा सल्ला सुचवलं आहे.
वातावरण बदलानुसार पृथ्वीचं तापमान चिंताजनक स्तरावर आहे. त्यामुळेच आपल्या
ग्रहाचं वाढलेलं तापमान कमी करण्यासाठी वैज्ञानिक नवीन नवीन मार्गांचा शोध
घेत आहेत.
हवेतील कार्बन शोषून
घेणारं तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला अनेक संशोधकांनी दिला आहे. पृथ्वीचं तापमान चिंताजनक स्तरावर असल्याने अधिक परिणाम कारण उपाय योजना करणं आवश्यक आहे. यासाठी सुर्यप्रकाश परावर्तित करुन पुन्हा अंतराळात पाठवण्यासाठी काही करता येईल का यावर अभ्यास करण्यात आला. त्यावेळेस अशा सात गोष्टींवर संशोधकांचं एकमत झालं त्यांच्या माध्यमातून हे साध्य करता येईल. यामध्ये कॅसीट, अॅल्यूमिनियम, सिलिकॉन कार्बाईट, सल्फर डायऑक्साइड या पदार्थांचा समावेश आहे. मात्र या एकूण सात पदार्थांपैकी हिऱ्यांची पूड ही सर्वात परिणामकारक असल्याचं दिसून आलं. हिऱ्यांची पूड पृथ्वीच्या वातावरणामधील उच्च स्तरावर सोडली तर तिच्या मदतीने जास्तीत जास्त सुर्यप्रकाश आणि सूर्याची उष्णता परावर्तित करता येईल, असं संशोधकांना संशोधनानंतर दिसून आलं.
हिऱ्यांची पूड अधिक सोयीस्कर कारण
आजपर्यंत संशोधकांच्या दाव्यानुसार सल्फर डायऑक्साइड वातावरणामध्ये सोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र यामुळे अॅसिडचा पाऊस पडू शकतो आणि ओझोनच्या स्तरावर सल्फर डायऑक्साइडचा दुष्परिणाम होऊ शकतो. मात्र हिऱ्याची पूड ही नैसर्गिकरित्या रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय असते. त्यामुळे सल्फर डायऑक्साइडपेक्षा हिऱ्यांची पूड वापरणं अधिक फायद्याचं ठरु शकतं. हिरा रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय असल्याने त्याचा वातावरणावर फारसा परिणाम होणार नाही.
वर्षाला 5000000000 किलो हिऱ्यांची पूड
वातावरणातील बदलासंदर्भात अभ्यास केल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, वर्षाला 5 मिलियन टन म्हणजेच 5000000000 किलो सिंथेटीक हिऱ्यांची पूड वातावरणाच्या वरच्या स्तरात सोडायला हवी असा वैज्ञानिकांचा सल्ला आहे. त्यामुळे 45 वर्षांमध्ये पृथ्वीचं तापमान 1.6 अंश सेल्सिअसने कमी होईल.
सगळ्यात मोठी चिंता खर्चाची
मात्र हा उपाय परिणामकारक असला तरी यासाठी फारच मोठ्याप्रमाणात खर्च करावा लागेल. यासाठीच्या खर्चाचा आकडा पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. दरवर्षी 5000000000 किलो हिऱ्यांची पूड वातावरणाच्या वरच्या भागात सोडण्यासाठी 200 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स इतका खर्च येईल. रुपयांमध्ये सांगायचं झाल्यास हा खर्च 1682 कोटी 4 लाख 47 हजार 60 कोटी रुपये इतका आहे. आकड्यांमध्ये सागायचं झालं तर हा आकडा 16,82,04,47,60,00,00,000 इतका मोठा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.