विकासकामे सांगण्यासाठी एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान सांगली जाती-धर्माच्या दुहीतून, राजकीय कुरघोड्यातून अपघाताने खासदार झालेल्या विशाल पाटील यांनी बेताल वक्तव्य थांबवावित अन्यथा तुमचा राजकीय इतिहास काढावा लागेल, असा इशारा भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. तुमच्या चाळीस वर्षाच्या काळातील आणि माझ्या दहा वर्षाच्या कामे सांगायची असतील तर समोरासमोर येण्याचे आव्हानही त्यांनी दिले.
माजी खासदार संजय पाटील म्हणाले, खासदार विशाल पाटील यांनी कवठेमहांकाळमध्ये जावून माझ्याविरोधात वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला, त्याला प्रत्तुत्तर देत आहे. केंद्र सरकारने गेल्या शंभर दिवसात व्हिजन आखून काम केले, मात्र खासदार विशाल पाटील यांनी शंभर दिवसात काय केले? असा सवाल करीत मणेराजुरीत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना तर सावळजमध्ये रोहित पाटलांना, खानापुरात सुहास बाबरांना, जतमध्ये विलासराव जगताप, विक्रमसिंह सावंत, सांगलीत पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील यांच्याबाबत वेगवेगळी भूमिका घेतली. आमदार विश्वजीत कदमांना नेते म्हणायचे आणि दुसरीकडे राजकीय अडचणी कशा होतील, हे पहायचे हेच काम सद्या करीत आहेत. उपकाराची जाणीव ठेवण्यापेक्षा स्वतःची भूमिका बदलत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
संसदेत जावून बोलबच्चन होण्यापेक्षा लोकांमध्ये जावून विकासकामे करावी लागतात. तुमच्या घराण्याकडे चाळीस वर्षे विविध पदे राहिली. तुम्ही केलेली चाळीस वर्षातील कामे आणि माझ्या दहा वर्षात झालेली कामे तुमच्या दहा पटीने अधिक आहेत. मी रस्ते, रेल्वे, सिंचन योजना, जलजीवनची कामे केली. तुम्ही सहकारी संस्था मोडून खाऊन भ्रष्टाचार केला. साखर कारखाना, दूध संस्था, प्रकाश अॅग्रो, मका प्रकल्प, शाबू प्रकल्प बंद पाडला. तुम्ही केलेली कामे आणि मी केलेली कामे सांगण्यासाठी समोरासमोर एकाच व्यासपीठावर येण्याचे आव्हानही संजय पाटील यांनी केले. यापुढे बेताल वक्तव्य कराल तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिल
पापाचे पाढे वाचायला लावू नका
मणेराजुरी, अलकूडची तेराशे हेक्टरवरील एमआयडीसी होती, त्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती, ती कुणी थांबवली, त्यामध्ये कुठला राजकीय स्वार्थ होता. आता ३६ हेक्टरवर एमआयडीसीचा बोलबाला करताय तुमच्याकडे आमदारकीपासून मंत्रिपदे होती. तासगाव-कवठेमहांकाळच्या जनतेसाठी तुम्ही विकास केला काय? तुमच्या पापाचे पाडे वाचायला लावू नका, असा इशारा माजी खासदार संजयकाका पाटील यांनी रोहित पाटील यांना दिला. कवठेमहांकाळमध्ये सहानुभूती आणि भावनिकतेचा केविलवाणा प्रयोग आपण हाणून पाडला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.